Contents1 Spirit Possession Meaning Explained- विज्ञान, मानसशास्त्र, वास्तवाचा शोध2 “Spirit Possession Meaning”, भुत लागणे म्हणजे काय?3 तज्ज्ञ काय सांगतात?4 महिलांमध्ये “अंगात येणे” अधिक का दिसते?5 काही मानसशास्त्रज्ञांच्या मते:6 विज्ञान काय सांगते?7 सामूहिक भीती व “भूत”–8 अंधश्रद्धेचे धोकादायक परिणाम9 माध्यमे आणि भयपटांचा प्रभाव–10 निष्कर्ष–10.1 अधिक वाचा–10.2 About The Author10.2.1 Dr.Nitin Pawar Spirit Possession Meaning Explained- विज्ञान, मानसशास्त्र, वास्तवाचा शोध 18 मे 2026 Spirit Possession Meaning म्हणजे एखाद्याला किंवा एखादीला भुत लागणे, किंवा एखाद्या समुहाला म्हणजे अगदी घोळक्याने भुत लागलेली माणसे आहेत. हे खरे आहे! तो, ती किंवा ते नाटक करत नाहीत. हे ही खरे आहे. मग नेमके काय होते? हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. रेणुका बाळंत झाली. तिला मुलगी झाली.अतिशय गोंडस.साधारणपणे त्यानंतर एक महिन्यांचा कालावधी असेल. रेणुकाला भूत लागलं. ती डोळे मोठे करू लागली. ‘घोगरा’ आवाज काढून काहीबाही बोलू लागली. ती माझा खूप लाड करत असे. ती अतिशय देखणी अशी तरुणी होती. ती आमच्या वडिलांच्या शिपायाची मुलगी होती.मग अगोदर तिला दवाखान्यात देण्यात आले.डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे मानसिक बाब असल्याचे सांगितले. औधधे दिली. पण तरी ती तसेच करू लागली. गावातील एक मुस्लिम देवरुषीआला. आमच्या वडिलांनी मला तिकडे जाऊ नकोस असं सांगितलं.तरी मी एकदा डोकावून पाहिले. तिने माझ्याकडे पाहिले. डोळे थोडे मोठे करून स्मित हास्य् केले. ते मला विचित्र वाटले. म्हणून थोडासा घाबरून मी पटकन माझ्या घरात गेलो. सायंकाळच्या सुमारास तो देव ऋषी आला. मग तिच्या संगे मोठ्या मोठ्याने बोलू लागला. ” कोण आहेस तू? सांग तुला आज सोडणार नाही” असे तो बोलल्याचे शेजारच्या आमच्या घरामध्ये मला थोडे ऐकू आहे. त्यावर रेणुका म्हणत असे, ” मी झाड आहे! नाही आता नाही, हे झाड मी सोडणार नाही सोडणार”. तो म्हणत असे, “सोडून दे “आणि दनादन धपाटे टाकल्यासारखा आवाज येत होता. काही वेळाने रेणुकाचा आवाज शांत झाला. आणि तो मुस्लिम भगत निघुन गेला. त्यानंतर रेणुकाने परत असे काही केले नाही.पण बाया बोलत असत,’ज्या दवाखान्यात ती बाळंत झाली. तिथे एका बाईची भूत आहे. तिथे ती बाई मेली होती. म्हणून तिचा आत्मा भटकतो. तिचे भुत इतर बाळंत होणाऱ्या एखाद दुसऱ्या स्त्रीला लागत असे. तर ही सत्य घटना आहे. दत्तवाड, शिरोळ, जिल्हा-कोल्हापूर येथील. ही रेणुका देवदासी होती. तिला देवाला सोडले होते.तिचे लग्न झाले नव्हते. तरी तिला एक मुलगी झाली होती. हे मला थोड्या दिवसात समजले. मी अगदी प्राथमिक शाळेत होतो. चौथीच्या आत मध्येच असेल. रेणुका ही आमच्या कुटुंबाबरोबर विशेषता माझा फार लाड करत असे. त्यामुळे साहजिकच मला तिचा स्वभाव खूप आवडत असे. आणि म्हणूनच तिची घटना मी आजही आठवू शकतो. तर यानंतर अनेक स्त्री, पुरुष, मुले, मुली अगदी लहान मुलांना देखील भुत लागलेले मी पाहिले होते. भूत लागण्याचे आणि नंतर ते गेल्याचे मी ऐकले, पाहिले आणि निरीक्षणही केले. त्यानंतर म्हटलं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते तोपर्यंत त्यांच्या कार्यक्रमांना जात असे. त्याविषयी लिखाण वाचत असे. आणि घरामध्ये वडील सांगत असत की हे सर्व सायकॉलॉजिकल असते वगैरे. तर वरील प्रसंग केवळ एका गावाचा नाही. भारतात आणि जगभरात “Spirit Possession Meaning” म्हणजेच “भूत अंगात येणे, लागणे ” या संकल्पनेभोवती असंख्य गैरसमज, अंधश्रद्धा आणि भीती विणली गेली आहे. पण खरोखरच एखाद्या व्यक्तीच्या शरीरात भूत प्रवेश करते का? विज्ञान,मानसशास्त्र काय सांगते? “Spirit Possession Meaning”, भुत लागणे म्हणजे काय? सामान्य भाषेत, एखादी व्यक्ती अचानक विचित्र वागू लागते.ओरडू लागते. वेगळ्या आवाजात बोलू लागते. हिंसकही बनते, अतिशय घाबरटही बनते. किंवा स्वतःवरचे नियंत्रण गमावल्यासारखी दिसते. तेव्हा लोक म्हणतात — “तिला भूत अंगात आले आहे.””किंवा भुत लागले आहे ” इंग्रजीमध्ये याला “Spirit Possession” असे म्हणतात. परंतु आधुनिक विज्ञान आणि मानसशास्त्र या अनुभवाकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात.नव्हे तर यामागील कारण शोधून काढतात. काही प्रशिक्षित कार्यकर्ते भुते काढतात. त्यामागील शास्त्रीय कारण देखील समजावून सांगतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कित्येक कार्यकर्ते हे काम करतात. मानसिक आरोग्याविषयी जागतिक माहिती येथे वाचा: https://www.who.int/health-topics/mental-health?utm_source=chatgpt.com#tab=tab_1 उपचार, समुपदेशनानंतर अशा व्यक्तींची अवस्था सुधारते. हा प्रसंग दाखवतो की अनेक वेळा ते “भूत” नसते —ती असते ती मदतीसाठी ओरडणारी, विक्षिप्त अशी एक मानसिक अवस्था. तज्ज्ञ काय सांगतात? 1. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुजाता देशमुख म्हणतात: “अनेक लोक ज्याला भूत समजतात, ती प्रत्यक्षात Dissociative Disorder किंवा तीव्र मानसिक तणावाची अवस्था असू शकते.” 2. न्यूरोलॉजिस्ट डॉ. अमोल चौधरी यांचे मत: “अपस्माराचे झटके, panic attacks किंवा काही न्यूरोलॉजिकल समस्या पूर्वी भूतबाधा समजल्या जात होत्या. विज्ञानाने त्यांची वैद्यकीय कारणे स्पष्ट केली आहेत.” 3. सामाजिक अभ्यासक प्रा. रवींद्र मोरे सांगतात: “ज्या समाजात भीती, शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य, अंधश्रद्धा जास्त असते, तिथे ‘अंगात येणे’ किंवा “भुत लागणे” या घटनांना अलौकिक अर्थ दिला जातो.” महिलांमध्ये “अंगात येणे” अधिक का दिसते? • भारतीय समाजात विशेषतः अनेक महिलांना • भावना मोकळेपणाने व्यक्त करता येत नाहीत. • कौटुंबिक दबाव सहन करावा लागतो. सामाजिक निन्दा, बदनामीची भिती मोठी असते. मानसिक आरोग्याविषयी बोलण्याची मोकळीक नसते. किंबहुना मनाचे देखील काही आजार असतात. ते मनापासून सुरू होऊन शरीरापर्यंत जातात. शारीरिक लक्षणे दाखवतात. मनोशारीरिक असतात.सायकोसोमॅटीक मनोशारीरीक लक्षणे दाखवतात. निर्माण करतात. दिसतात,जाणवतात आणि त्रासही माणसाला होतात. हे माहितही नाही. अशी आपल्या समाजात अवस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते: “अंगात येणे” हे अनेकदा दडपलेल्या भावनांचे सामाजिक स्वरूप असते. जेव्हा सामान्य रडणे किंवा विरोध दुर्लक्षित होतो, तेव्हा “देवी आली””भुत लागले”,असे म्हटले की अचानक समाज त्या व्यक्तीकडे लक्ष देतो. तो व्यक्ती भाबवून जातो किंवा घाबरतो किंवा अधिक आक्रमक होतो. किंवा त्याचे दैवतीकरण करतो. पीडित व्यक्तीलाही ते संरक्षण वाटते. विज्ञान काय सांगते? आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिक संशोधनाने शरीरात भूत प्रवेश करते, किंवा ते अस्तित्वात आहे, हे सिद्ध केलेले नाही. किंवा ते अस्तित्वात आहे असे मानणाऱ्याने ते सिद्ध करून दाखवलेले नाही. मात्र काही आर्थिक सामाजिक आणि इतर संबंध स्वार्थी हेतू, सत्ता इत्यादी कारणांसाठी सध्या आधुनिक विज्ञानातील ‘शब्द’च वापरूनच या घटनांचे स्पष्टीकरण,समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. सामान्य माणसाला ते खरे वाटते. याला सिडोसायन्स असे म्हणतात. त्याला अर्थ छदमविज्ञान असे म्हणतात. अर्थात खोटे विज्ञान! हे खरे आहे की काही मानसिक आणि न्यूरोलॉजिकल स्थितींमध्ये व्यक्तीचे वर्तन अचानक बदलू शकते: • Dissociative Disorder • Panic Attack • Schizophrenia • Epilepsy • Trauma Response मानसशास्त्रीय माहिती येथे वाचा: अपस्मार आणि “भूत” पूर्वी अपस्माराचा झटका आला की लोक पुर्वी म्हणायचे — “भूत लागले.” कारण : • व्यक्ती अचानक पडते • शरीर झटके देते • तोंडातून फेस येतो • डोळे फिरतात आज विज्ञान सांगते की हा मेंदूतील विद्युत क्रियांचा विकार आहे. अपस्माराबद्दल माहिती: https://www.psychiatry.org/patients-families/what-is-mental-illness?utm_source=chatgpt.com सामूहिक भीती व “भूत”– कधी कधी शाळा किंवा वसतिगृहात अनेक विद्यार्थी अचानक घाबरतात, किंचाळतात किंवा बेशुद्ध पडतात. लागलीच अफवा पसरते — “भूत लागले !” मोठ्या संख्येने लोक तसेच समजतात. मानसशास्त्र याला “Mass Psychogenic Illness” म्हणते. • भीती संसर्गासारखी पसरू शकते. • धार्मिक स्थळांवर आराम का मिळतो? • अनेकांना मंदिरात, दर्ग्यात किंवा धार्मिक ठिकाणी गेल्यावर अशा पीडितांना शांत वाटते. यामागे काही कारणे: • मानसिक आधार • सामूहिक श्रद्धा • भावनिक सुरक्षितता • Placebo effect याचा अर्थ भूत निघाले असा होत नाही. तर मनातील किंवा मनावरील दडपण, भिती,कोंडलेल्या भावना इत्यादी मोकळ्या होतात. नाहीशा होतात. मनाला बरे वाटते. अंधश्रद्धेचे धोकादायक परिणाम भारतामध्ये अजूनही काही ठिकाणी “भूत काढणे” या नावाखाली: • मारहाण • जाळणे • उपाशी ठेवणे • लैंगिक शोषण • उपचार नाकारणे असे प्रकार घडतात. अनेक लोक,मानसिक रुग्ण उपचाराऐवजी अंधश्रद्धेकडे ढकलले जातात. कुटुंब परिसर आणि समाज जो मोठ्या संख्येने अशिक्षित किंवा शिकून देखील वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाल्यामुळे अशा लक्षणांना भूत लागणे, देव/देवी अंगात येणे, इत्यादी समजतो. माध्यमे आणि भयपटांचा प्रभाव– भूतांचे चित्रपट, यूट्यूब व्हिडिओ, हॉरर reels अलीकडच्या काळात लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. विशेषतः: • लहान मुले • संवेदनशील व्यक्ती • तणावग्रस्त लोक यांच्यावर याचा खोल परिणाम होतो. एखादी व्यक्ती “अंगात आली”, “भुत लागले” असे वाटल्यास काय करावे? • घाबरू नका • व्यक्तीला सुरक्षित जागी ठेवा • झाडफुंक किंवा मारहाण टाळा • डॉक्टरांचा सल्ला घ्या • मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधा • सहानुभूतीने संवाद साधा निष्कर्ष– “Spirit Possession Meaning” म्हणजे प्रत्यक्ष भूत शरीरात प्रवेश करते असे समजणे, असणे याला एकही स्पष्ट असा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. अनेक वेळा हे मानसिक तणाव, भावनिक वेदना, सामाजिक दबाव तसेच सांस्कृतिक भीती यांचे मिश्रण असते. अंधश्रद्धा भीती वाढवते. विज्ञान प्रश्न विचारायला शिकवते. भूतापेक्षा खरी भीती मोठी असते. आणि भीतीवरचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे — ज्ञान, समज, वैज्ञानिक दृष्टिकोन! अधिक वाचा– Superstition Awareness in Marathi : चला अंधश्रद्धा गाडु या! – About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशन Superstition Awareness in Marathi : चला अंधश्रद्धा गाडु या! –