162334IMG-20260727-WA0478(1)WA_1783784616091IMG-20260730-WA0018 दारु निर्मिती अड्डा उद्वस्त : शिरूर पोलीसांची मोठी कारवाई ,पहा व्हिडिओसह. .. दारु निर्मिती अड्डा उद्वस्त ‘शिरुर,दि.८ ऑक्टोबर २०२५ | प्रतिनिधी| https://www.satyashodhak.blog/wp-content/uploads/2025/10/VID-20251008-WA0025.mp4 दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री. संदीप केजळे, पोलीस निरीक्षक ,शिरूर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पो.नि.संदेश केजळे, पो.हवा.सुदिक, पो.हवा.कलमकर, पो.हवा.भवर यांनी कवठे यमाई, पिंपरखेड, जांबुत, आमदाबाद गावच्या हद्दीत ता.शिरूर, जि.पुणे येथे अचानकपणे गावठी हातभट्टी निर्मिती व देशी विदेशी दारूवर यशस्वीपणे एकूण ४ छापे टाकून कारवाई केली आहे. एकूण १,२३,७२५/- रु. किमतीचा माल मुद्देमाल जप्त व नष्ट केलेला आहे. सदर छापा कारवाईमध्ये ४) सागर गणपत गडगुळ रा.कवठेयमाई ता.शिरूर जि.पुणे २) सदगुरु निवृत्ती मुंजाळ रा.कवठेयमाई, ता.शिरूर, जि.पुणे ३) भाऊसाहेब साहेबराव भोर, रा.पिंपरखेड, ता.शिरूर, जि.पुणे ४) प्रविण कैलास सोनवणे, रा.राजुबुग, ता.शिरूर, जि.पुणे ५) आंबादास सिताराम तिक्खम, रा.अकोला, ता.उमरड, जि.नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण श्री.संदिपसिंग गिल (भा.पो.से.), मा.अपर पोलीस अधीक्षक सो, पुणे विभाग श्री.रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, शिरूर उपविभाग श्री.प्रशांत डोले, पोलीस निरीक्षक पो.नि.श्री.संदेश केजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुदिक, पोलीस हवालदार कलमकर व पोलीस हवालदार भवर यांनी केलेली आहे. गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री तसेच विना परवाना देशी विदेशी दारूचा साठा व विक्री यासारख्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना शिरूर पोलीस प्रशासनाने सुस्पष्ट आव्हान आहे की, त्यांनी त्वरित हे बेकायदेशीर उद्योग बंद करून कायद्याचा आदर करावा. अन्यथा, पोलीस प्रशासनाकडून अशाप्रकारे कठोर पावले उचलण्यास येतील! ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन पत्रकार शौकत मुजावर यांच्या कन्यांची राज्यस्तरीय कामगीरी ! Breaking News: शिरूर पोलिस ठाण्याची मोठी कारवाई — विदेशी दारूचा साठा जप्त