11 जुन 2026 Javed Miandad Last Ball Six Story ही माझ्या “किस्से क्रिकेट के” या सदरासाठी हा किस्सा अत्यंत मौल्यवान आहे. कारण हा फक्त जावेद मियांदादच्या षटकाराचा इतिहास नाही, तर एका ग्रामीण मुलाच्या क्रिकेटप्रेमाचा जन्म आहे. हे पुढे लाखो, आता करोडो भारतीय क्रिकेट शौकीनान्चा कधीतरी पहिल्या प्रेमात पडण्याचा किस्सा विसरला जात नाही. तसाच क्रिकेट या प्रेयसीच्या प्रेमात पडण्याचा क्षण देखील अविस्मरणीय ठरत असते. Contents 1 Javed Miandad Last Ball Six Story : जावेद मियांदादचा ‘तो’ षटकार आणि माझ्या क्रिकेटप्रेमाचा जन्म2 “भारत-पाकिस्तानची मॅच आहे,” कोणीतरी सांगितले.3 एक-एक चेंडू संपत होता.4 भारत हरला होता.5 पहिले क्रिकेट स्टेडियम?6 आमची स्वतःची टीम होती—”जय भवानी”.7 मोठा क्रिकेट पराक्रम घडला7.1 आणखीन वाचा—-7.2 About The Author7.2.1 Dr.Nitin Pawar7.3 ❤️ Support Satyashodhak Blog Javed Miandad Last Ball Six Story : जावेद मियांदादचा ‘तो’ षटकार आणि माझ्या क्रिकेटप्रेमाचा जन्म काही घटना अशा असतात की त्या घडताना त्यांचे महत्त्व समजत नाही. पण आयुष्याच्या अनेक दशकांनंतर मागे वळून पाहिले की लक्षात येते—त्या घटनेने आपल्या आयुष्याची दिशा बदलून टाकलेली असते. माझ्यासाठी अशीच एक घटना म्हणजे 1986 च्या शारजाह फायनलमध्ये जावेद मियांदादने मारलेला शेवटच्या चेंडूवरील षटकार. साल होते 1986. मी चौथीच्या आतमध्ये शिकत असणार. आमचे वास्तव्य होते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे. त्या काळात गावात टीव्ही असणे ही मोठी गोष्ट होती. ग्रामपंचायतीच्या एका छोट्याशा खोलीत सार्वजनिक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ठेवलेला होता. आजच्या पिढीला त्याची कल्पनाही करता येणार नाही. तो टीव्ही म्हणजे जणू एखाद्या गावाच्या सांस्कृतिक जीवनाचे केंद्र बनलेले होते. खरे तर मी त्या टीव्हीसमोर यापूर्वी दोन-तीन वेळा गेलो होतो. तेही विक्रम-वेताळ मालिका पाहण्यासाठी. बाकी वेळ आम्ही मुलं बाहेर मैदानावर खेळण्यात रमलेली असायचो. क्रिकेट काय असते याची फारशी माहिती नव्हती. एका ओव्हरमध्ये सहा चेंडू असतात एवढेच ज्ञान होते. त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळे होते. ग्रामपंचायतीच्या खोलीबाहेर असामान्य गर्दी दिसत होती. आत बसायला जागा नव्हती. बाहेर उभे असलेले लोक मान लांब करून खिडक्यांमधून आत डोकावत होते. एवढी माणसं का जमली आहेत हे पाहण्यासाठी मीही तिकडे गेलो. “भारत-पाकिस्तानची मॅच आहे,” कोणीतरी सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काहीतरी वैर आहे एवढेच मला तेव्हा माहीत होते. इतिहास, राजकारण, फाळणी, युद्धे याबद्दल काहीही माहिती नव्हती. पण भारत म्हणजे आपला देश आणि पाकिस्तान म्हणजे प्रतिस्पर्धी, एवढे मात्र नक्की समजत होते. मी गर्दीतून वाट काढत थोडा पुढे गेलो. टीव्हीसमोर बसलेल्या लोकांचे चेहरे पाहत होतो. कधी टाळ्यांचा कडकडाट, कधी निराशेचा आवाज, कधी एकदम शांतता. वातावरणात एक विचित्र तणाव भरून राहिला होता. माझ्यासाठी क्रिकेटचा तो पहिलाच खरा अनुभव होता. Javed Miandad Last Ball Six Story आजही माझ्या स्मरणपटलावर सेव्ह आहे. हे खरे! सामना शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. शेवटची ओव्हर सुरू होती. खोलीतील प्रत्येक जण श्वास रोखून बसला होता. मला नियम समजत नव्हते, पण वातावरणातून सामन्याचे गांभीर्य जाणवत होते. एक-एक चेंडू संपत होता. गोंधळ, आरोळ्या, शांतता आणि पुन्हा गोंधळ. आणि मग आला शेवटचा चेंडू. आजही माझ्या स्मरणात धूसरपणे ते दृश्य जिवंत आहे. एक बारीक शरीर यष्टीचा, दाढी असणारा,गोलंदाज धावत येतो. चेंडू टाकतो. समोरचा फलंदाज जोरदार फटका मारतो. चेंडू सीमारेषेबाहेर जातो. आणि क्षणार्धात वातावरण बदलते. काही लोक स्तब्ध होतात. काहींच्या तोंडून निराशेचा आवाज निघतो. भारत हरला होता. नंतर कळले की तो फलंदाज होता जावेद मियांदाद आणि गोलंदाज होता चेतन शर्मा. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध षटकारांपैकी एक माझ्या डोळ्यांसमोर घडला होता.तो होता- Javed Miandad Last Ball Six Story पण त्या क्षणी मला इतिहास घडला आहे हे माहीत नव्हते. मात्र एक गोष्ट मनाला लागली होती. भारत हरला होता. त्या लहानशा वयात पहिल्यांदाच राष्ट्राभिमान नावाची भावना मनात कुठेतरी जागी झाली. भारत-पाकिस्तान संबंधांचे स्वरूप माहीत नव्हते, पण भारताचा पराभव पाहून वाईट वाटले होते. त्या दिवशी ग्रामपंचायतीच्या खोलीतून बाहेर पडताना मी पूर्वीसारखा नव्हतो. क्रिकेट माझ्या मनात प्रवेश करून बसले होते. Javed Miandad Last Ball Six Story ने त्यानंतर क्रिकेटचा नाद लागला आणि तो नाद म्हणजे नादच होता. शाळा सुटली की उरलेला संपूर्ण वेळ क्रिकेटसाठी राखीव असायचा. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चेंडू दिसला पाहिजे, एवढीच इच्छा असायची. पहिले क्रिकेट स्टेडियम? दत्तवाडमधील जाधव मळा आणि टूरिंग टॉकीजच्या मैदानाभोवती आमचे क्रिकेटविश्व तयार झाले. मोठ्या माणसांच्या सामन्यांकडे आम्ही आदराने पाहायचो. महादूगोंडा, नरसगोंडा पाटील, कांबळे, अहिवळे, गजराबाईंचा मंगेश अशी अनेक नावे आजही स्मरणात आहेत. त्यांचे सामने आम्ही लांबून पाहत बसायचो. चेंडू मैदानाबाहेर गेला की आम्ही धावत जाऊन तो आणायचो. विकेट पडली की आनंदाने ओरडायचो. त्यांच्या खेळातून नकळत क्रिकेट शिकत होतो. मोठी माणसं गेल्यावर मैदान आमचे व्हायचे. आमची स्वतःची टीम होती—”जय भवानी”. आज विचार केला तर ते क्रिकेट बालिश होते. ना योग्य तंत्र, ना योग्य साधने. पण उत्साह मात्र अफाट होता. मी संघाचा कर्णधार होतो. गोलंदाजी माझी ताकद होती. वेग नव्हता, पण नेमका टप्पा होता. मोठा क्रिकेट पराक्रम घडला आणि एक दिवस माझ्या आयुष्यातील पहिला मोठा क्रिकेट पराक्रम घडला. एका सामन्यात मी एका षटकात पाच बळी घेतले.पुरावा महादगोन्डा नरसगोन्डा पाटील, आज माझ्याच वयाचा असेल, अहिवळे, काम्बळे ही तीन नावे दत्तवाडमधे आज सापडतील.( हयात असतील तर या आपल्या बालमित्राशी सम्पर्क करा- 7776033958,नितीन, आणखीन बबरु/ बाबर, सलिम किराणा दुकानवाले, सर्व दत्तवाड ) आजच्या 20/20 मापदंडावर ते फार मोठे यश नाही. पण त्या वयात ते आमच्यासाठी विश्वचषक जिंकल्यासारखे होते. पुढे गावागावांमध्ये संघ तयार झाले. स्पर्धा वाढली. क्रिकेट उत्सव बनला. रोमांच वाढला. पैसा आला. आणि आश्चर्य म्हणजे जिथे मी असायचो तिथे क्रिकेटभोवती एक वेगळे विश्व तयार व्हायचे. Javed Miandad Last Ball Six Story ने मला चांगला क्रिकेटर बनवले. मन भरुपर्यत क्रिकेट चा आनंद घेतला नव्हे क्रिकेट जगलो अक्षरशः! आज अनेक दशकांनंतर मागे वळून पाहतो तेव्हा जाणवते की माझ्या आयुष्यातील क्रिकेट पर्वाची सुरुवात एका पराभवातून झाली होती. भारत हरला होता. जावेद मियांदाद जिंकला होता. पण त्या षटकाराने माझ्या मनात क्रिकेट जिंकले होते. कदाचित चेतन शर्माच्या त्या शेवटच्या चेंडूने पाकिस्तानला विजय दिला असेल; पण त्याच चेंडूने कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावातील एका मुलाला आयुष्यभरासाठी क्रिकेटचा चाहता बनवले होते. म्हणून आजही जेव्हा जावेद मियांदादचा तो ऐतिहासिक षटकार टीव्हीवर दिसतो, तेव्हा मला फक्त एक क्रिकेट सामना आठवत नाही. मला आठवते ते दत्तवाडचे ग्रामपंचायत कार्यालय. तो छोटासा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. श्वास रोखून बसलेले गावकरी. आणि क्रिकेटच्या प्रेमात पडलेला चौथीतला एक मुलगा. ::: आणखीन वाचा—- Filmi Kisse : अमिताभ बच्चन यांचा आवाज ;रेडियो जॉकी जैसा? काय किस्सा आहे? आज ती Match यू ट्यूब वर उपलब्ध आहे — About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन क्रिकेट मधे आता अमेरिकाही ! ट्वेंटी२० वर्डकप 2024 चे सामनेही अमेरिकेत होणार !