Osho Life Mystery हा आधुनिक अध्यात्माच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे.आजचे बहुतेक celebrity असणारे वक्ते, गुरु, लेखक आणि अगदी ध्रुव राठी सारखे यु ट्यूबर आणि सर्जनशिल व्यक्ती ओशोन्च्या प्रभावातुन गेले असल्याचे दिसते. अध्यात्मिक क्षेत्रात कळत नकळत ओशो यांची copy देखील करताना आपल्याला अनेक जण दिसतात. हे ओशो यांची पुस्तके वाचलेली पिढी आहे. आचार्य प्रशांत हे देखील एक आहेत. राजू परुळेकर यांसारखे प्रबोधनकार मराठी मधे दिसतात. जे ओशो वाचायचे ते स्वतन्त्र विचार करणारेच निर्माण झाले. “जगावर प्रभाव पाडणारे सर्वात मोठे भारतीय आचार्य ओशो रजनीश हेच आहेत. Quantitatively and Qualitatively नक्कीच ‘या सम हाच’हीच उक्ती लागु पडते ओशो यांना! ते विचारवंतांचे गुरु होते.बेजोड Logic हे त्यांचे वैषिट्य होते. जगातील एकही विषय ओशोच्या नजरेतून सुटला नाही. कसे जगायचे हे ओशो यांनी थेट सांगितले, जे पुर्वी कोणी सांगण्याची हिंमत केली नव्हती !” भगवान रजनीश अर्थात ओशो यांनी पारंपरिक धर्म, अध्यात्म, ध्यान, प्रेम, स्वातंत्र्य,मानवी चेतनेचे पदर, शिक्षण,धर्म, इतिहास, सामाजिक तथ्ये, isms यांवर मांडलेल्या विचारांनी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित केले. त्याचवेळी त्यांच्या जीवनातील अनेक घटना,अमेरिकेतील ओरेगान येथील त्यांचा ‘रजनीशपुरम प्रयोग’,एकाच वेळेस दहा हजार ‘बुद्ध’निर्माण करण्यासाठी प्रयत्न, अमेरिकेतील कायदेशीर संघर्ष आणि त्यांच्या मृत्यूभोवतीचे वाद आजही संशोधक, लेखक आणि अभ्यासकांसाठी चर्चेचा विषय आहेत. या लेखात उपलब्ध ऐतिहासिक नोंदी, विविध दृष्टीकोन आणि सार्वजनिक माहितीच्या आधारे ओशोंच्या जीवनाचा सखोल आढावा घेऊ. ओशो एक परिचय Contents1 Osho Life Mystery: Osho कोण होते?2 Osho Life Mystery : मृत्यूभोवतीचे वाद3 Rajneeshpuram : एक सामाजिक प्रयोग4 Dynamic Meditation म्हणजे काय?5 ओशोंना “Sex Guru” का म्हटले गेले?6 Osho Legacy7 निष्कर्ष8 FAQs8.1 Q1. Osho यांचे खरे नाव काय होते?8.2 Q2. Rajneeshpuram कुठे होते?8.3 Q3. Dynamic Meditation म्हणजे काय?8.4 Q4. Osho यांच्या मृत्यूबाबत वाद का आहेत?8.5 Q5. Osho यांची पुस्तके आजही लोकप्रिय आहेत का?8.6 ❤️ Support Satyashodhak Blog Osho Life Mystery: Osho कोण होते? ओशो (जन्म : ११ डिसेंबर १९३१, कुचवाडा, मध्य प्रदेश) हे भारतीय तत्त्वज्ञ, अध्यात्मिक गुरु,तर्कतिर्थ, प्रभावी वक्ते होते. त्यांनी हजारो प्रवचने दिली असून ध्यान, स्वातंत्र्य, प्रेम, धर्म, मानसशास्त्र, सेक्स आणि मानवी चेतना यांवर व्यापक विचार मांडले. Osho Life Mystery : मृत्यूभोवतीचे वाद १९ जानेवारी १९९० रोजी ओशोंचे पुण्यात निधन झाले. अधिकृत नोंदीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे झाला. तथापि, त्यांच्या काही अनुयायांनी अमेरिकेतील तुरुंगवासादरम्यान विषप्रयोग झाल्याचा दावा केला आहे.तो आजही करतात. या दाव्यांना आजपर्यंत सार्वत्रिक मान्यता मिळालेली नाही आणि त्याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा विषय आजही वादाचा भाग आहे.यात बलाढ्य अमेरिकन सरकार कथितपणे एक ‘पात्र'(?) असल्यामुळे हे गुढ तसेच राहणार आहे. राहावेशी! “शरीराचा अंत करता येतो, पण विचारांचा नाही. ओशोंचा वारसा आजही जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.” “सत्याचा शोध घेणारा प्रत्येक विचारवंत वादाच्या केंद्रस्थानी असतो; ओशोंचे जीवन हे त्याचेच सर्वात मोठे उदाहरण आहे.” “रजनीशपुरम् हा केवळ आश्रम नव्हता; तो अध्यात्म, स्वातंत्र्य आणि सामाजिक प्रयोग यांचा जागतिक प्रयोग होता.” “ओशोंच्या मृत्यूभोवतीचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत, पण त्यांच्या विचारांची क्रांती काळाच्या पलीकडे जिवंत आहे.” Rajneeshpuram : एक सामाजिक प्रयोग १९८० च्या दशकात अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात उभारलेले Rajneeshpuram हे केवळ आश्रम नव्हते. ते एक स्वयंपूर्ण समुदाय commune उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग होता. मात्र स्थानिक प्रशासन, कायदेशीर वाद आणि अंतर्गत संघर्षांमुळे हा प्रयोग अखेरीस संपुष्टात आला. Osho Life Mystery हा लेख म्हणूनच लिहि Dynamic Meditation म्हणजे काय? ओशोंनी विकसित केलेले Dynamic Meditation हे पारंपरिक ध्यानापेक्षा वेगळे मानले जाते. यात श्वसन, शारीरिक हालचाल, भावनांची मुक्त अभिव्यक्ती आणि शांत ध्यान अशा टप्प्यांचा समावेश आहे. अनेक देशांमध्ये आजही ही पद्धत मानसिक तणाव कमी करण्यासाठी वापरली जाते. कोन्डलेल्या भावना मोकळ्या करणे ध्यानासाठी आवश्यक असते, ही बाब या पद्धतीने भावनांचे विरेचन करण्यासाठी एक नवा प्रयोग व अविश्कार ओशो यांचाच होता. 1. Deepak Chopra “Osho was one of the great spiritual teachers of our time.” — Deepak Chopra 2. Tom Robbins (American Novelist) “Osho is the most original thinker that India has produced: the most erudite, the most clear-headed and the most innovative.” — Tom Robbins 3. Federico Fellini (Italian Film Director) “Osho is a master who has helped me enormously.” — Federico Fellini 4. Khushwant Singh (Indian Author & Journalist) “Rajneesh was one of the most original thinkers India has produced.” — Khushwant Sing ओशोंना “Sex Guru” का म्हटले गेले? ओशोंनी लैंगिकतेबद्दल उघडपणे चर्चा केली. त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी दमनाऐवजी जागरूकतेचा मार्ग सुचवला. तर टीकाकारांनी त्यांच्या विचारांवर तीव्र आक्षेप घेतले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेबाबत दोन भिन्न दृष्टीकोन आजही अस्तित्वात आहेत. Osho Legacy आज जगभरात ओशोंची पुस्तके, प्रवचने आणि ध्यानपद्धती लोकप्रिय आहेत. त्यांच्या विचारांवर मतभेद असले तरी आधुनिक अध्यात्मावर त्यांनी मोठा प्रभाव टाकल्याचे अनेक अभ्यासक मान्य करतात. निष्कर्ष ओशोंचे जीवन हे प्रेरणा,सौंदर्य, वाद, प्रयोग आणि तत्त्वचिंतन यांचा अनोखा संगम होते. त्यांच्या मृत्यूभोवतीचे प्रश्न आणि विविध दावे आजही चर्चिले जात असले, तरी उपलब्ध पुरावे आणि ऐतिहासिक नोंदी यांचा संतुलित विचार करणे आवश्यक आहे. ओशोंचा खरा वारसा त्यांच्या विचारांमध्ये, ध्यानपद्धतींमध्ये आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या संदेशात दिसून येतो. FAQs Q1. Osho यांचे खरे नाव काय होते? उत्तर: चंद्रमोहन जैन. Q2. Rajneeshpuram कुठे होते? उत्तर: ओरेगॉन, अमेरिका. Q3. Dynamic Meditation म्हणजे काय? उत्तर: ओशोंनी विकसित केलेली सक्रिय ध्यानपद्धती. Q4. Osho यांच्या मृत्यूबाबत वाद का आहेत? उत्तर: काही अनुयायांनी विषप्रयोगाचे दावे केले आहेत, परंतु त्याबाबत ठोस सार्वजनिक वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. Q5. Osho यांची पुस्तके आजही लोकप्रिय आहेत का? उत्तर: होय, त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असून जगभर वाचले जाते. Read more》》》》 Osho Thoughts:ओशो विचार: जगण्याचे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक ;बुद्धत्वा;चा मार्ग ! ओशो कोणत्या धर्माचे होते? | Osho Ka Dharm Kya Tha? Osho on Guru Purnima :ओशोंच्या नजरेतून ;गुरु पूर्णिमा ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन 10 th Dimension :10 व्या परिमाणाचे रहस्य: विश्व आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने विशाल आणि गूढ !