file 00000000e590622f8d701bb023718dd8 1

Contents

शिरूर जांबुत गावात अनोळखी वयोवृद्धाचा मृतदेह: पोलीस तपास सुरु

शिरूर जांबुत गावात अनोळखी वयोवृद्धाचा मृतदेह:वय 55 ते 60 वर्षे.

शिरुर,दिनांक 3 मे : (प्रकाश करडे यांच्याकडुन )

शिरूर जांबुत गावात अनोळखी वयोवृद्धाचा मृतदेह:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबुत गावात ब्रिटानिया समृद्धी दूध संकलन केंद्राजवळ एका अनोळखी वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 55 ते 60 वर्षांच्या दरम्यान असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलीस पाटील, जांबुत यांनी माहिती दिली —

ही माहिती राहुल वसंत जगताप (वय 36), व्यवसायाने शेतकरी आणि पोलीस पाटील, रा. जांबुत यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या मते, दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास श्री. सुभाष दत्तात्रय जगताप यांनी फोनवरून माहिती दिली की दूध संकलन केंद्राजवळ एक अनोळखी इसम मयत अवस्थेत दिसत आहे.

शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद—

सदर घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मयत नं 59/2025, भारतीय नवसंहितेच्या कलम 194 अंतर्गत करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार क्रमांक 850 वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्याकडे आहे.

कोणतीही ओळखपत्रे मिळाली नाहीत—

कोणतीही ओळखपत्रे मिळाली नसून, संबंधित मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे. नागरिकांनी याबाबत कोणतीही माहिती असल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

——-


IMG 20250505 002243

खास वैचारिक भेट. ..

काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-

सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.

डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇

• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…

अंक ३३, सत्यशोधक मार्क्सवादी

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support