शिरुर मधे धारदार हत्याराने वार केला गेल्याची शिरुर पोलीस स्टेशनला तक्रार आली आहे.तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी पडला आहे.त्यामुळे शिरुर शहरात हिंसा का वाढत आहे? तालुक्यातील अपघात का थांबेनात ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अर्थात नेहमी प्रमाणे शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.अपघाताचे प्रतिक चित्र ! (सौजन्यः pixabay.com)

शिरुर जवळ 18 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी बोलत चालले होते. पण पुढे काय घडले? वाचा सविस्तर !

18 वर्षीय तरुणाचा मृत्यु : अज्ञात वाहनाने दिली धडक ! घटना शिरुर तालुक्यातील ! 

शिरुर , दिनांक 15 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट ) 

शिरुर जवळ एका गावात 18 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी बोलत चालले होते. पण पुढे काय घडले ? ते पुढे सविस्तर वाचा या बातमीत ! या18 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे ! अज्ञात वाहनाने तरुण व मुलगीस धडक दिल्याने हा तरुण मृत्युमुखी पडला आहे. तर मुलगी जखमी झाली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत. तरुणाच्या अपघाती मृत्यु मुळे निमोणे गावात शोककळा पसरली आहे.
शिरुर पोलिस स्टेशन , शिरुर.

 

शिरुर जवळ एका गावात 18 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी बोलत चालले होते. पण पुढे काय घडले ? ते पुढे सविस्तर वाचा या बातमीत ! या
18 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे ! अज्ञात वाहनाने तरुण व मुलगीस धडक दिल्याने हा तरुण मृत्युमुखी पडला आहे. तर मुलगी जखमी झाली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत. तरुणाच्या अपघाती मृत्यु मुळे निमोणे गावात शोककळा पसरली आहे.

शिरुर पोलिस स्टेशन मधे या घटनेची नोंद करण्यात आली आहे . तर

शिरुर जवळ घटना पुढीलप्रमाणे घडली आहे —

तारीख 14/02/2025 रोजी दुपारी 1: 15 वाजण्याच्या सुमारास निमोणे , तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हददीत फिर्यादी सोमनाथ दादा जाधव ,वय – 48 वर्ष , व्यवसाय – शेती व दुग्ध व्यवसाय , राहणार – माळवस्ती , निमोणे , तालुका – शिरूर , जिल्हा – पुणे हे राहतात. त्यांची स्कुटी गाड़ी क्रमांक. एम. एच. 12 यु. वाय. 0951 आहे. तिच्या वरून ते त्यांचा मुलगा शंतनु व साडुची मुलगी सानिका यांना गुनाट येथुन आणण्यासाठी निघाले होते. निमोणे ते गुनाट रोडने ते जात होते. ते निमोणे गावापासुन सुमारे 1 किलोमीटर अंतरावर नायरा पेट्रोल पंपाजवळ आले . त्यावेळेस त्यांचा मुलगा शंतनु व साडुची मूलगी सानिका असे दोघे रोडच्या कडेने निमोण्याकडे बोलत येताना दिसले .

Read more >>

” तुम्ही पोलीस स्टेशनला कम्पलेंटी दिली तर तुमचे हातपाय तोडुन टाकु “अशी दिली धमकी ? 

रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचा ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)

शिरुर जवळ गुनाट येथे घडली घटना —

तेव्हा फिर्यादी यांनी त्यांची गाडी नायरा पेट्रोल पंपांच्या जवळ रोडच्या पलीकडे बाजुस लावुन थांबले . तेव्हा ते दोघे त्यांच्या स्कुटी गाडीजवळ आले. नंतर फिर्यादी लघुशंकेला बाजुला गेले. त्यावेळी गुनाट बाजुकडुन निमोणे बाजुकडे जाणा-या रोडने नवीन मॉडेलची बोलेरो गाडी चालली होती. त्या वरील अज्ञात चालकाने मुलगा शंतनु सोमनाथ जाधव , वय -18 वर्ष ,राहणार – निमोणे, तालुका , शिरूर, जिल्हा – पुणे व साडुची मुलगी कुमारी सानिका सचिन कांबळे, वय -16 वर्ष, राहणार- गारमळा, मांडगण फराटा , तालुका – शिरूर , जिल्हा – पुणे यांना जोरात धड़क दिली . त्यात मुलगा शंतनु गंभीर जखमी झाला . त्याच्यावर उपचार करण्यापुर्वी त्याच्या मृत्यु झाला . साडुची मुलगी सानिका हिला किरकोळ व गंभीर दुखापत झाली . स्कुटी मोटार सायकलचे नुकसान झाले .

Read more>>

शिरुर जवळील एका गावात एक व्यक्ती ,’हवेत’,कोयता फिरवुन ,’हवा’ करत होता.तेवढ्यात पोलिस आले ! पुढे काय घडले ते वाचा…..

अज्ञात वाहन चालका विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —

अज्ञात चालक या घटनेला कारणीभुत झाला. त्या दोघांना औषधोपचारास घेवुन न जाता हा चालक त्यांच्या ताब्यातील वाहन निमोणे बाजूकडे घेवुन पळुन गेला आहे.

फिर्यादी –

सोमनाथ दादा जाधव ,वय -48 वर्ष, धंदा -शेती व दुग्ध व्यवसाय ,राहणार – माळवस्ती, निमोणे, तालुका- शिरूर ,जिल्हा -पुणे.

मयत –

शंतनु सोमनाथ जाधव, वय- 18 वर्ष, राहणार- निमोणे, तालुका ,शिरूर, जिल्हा – पुणे

जखमी :

सानिका सचिन कांबळे, वय -16 वर्ष ,राहणार – गारमळा, मांडगण फराटा, तालुका – शिरूर जिल्हा – पुणे

म्हणुन फिर्यादी यांनी अज्ञात बोलेरो गाडी वरील अज्ञात चालका विरूध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल केली आहे.

Read more>>

शिरुर तालुक्यातील महिलेला ,”तु माहेरुन सोने आण’ अशी मागणी करुन नातलगांकडुन काय छळ केला गेला ? वाचा सविस्तर!

शिरुर पोलीस स्टेशन मधे अज्ञात वाहन चालका विरुद्ध भारतीय न्याय संहीता कायदा कलम 281,125 (अ), 125 (ब) 106,324 (4), सह मोटार वाहन कायदा कलम 184,134/177 नुसार शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. उबाळे हे आहेत. पुढील तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक श्री. झेंडगे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे , शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support