162334IMG-20260727-WA0478(1)WA_1783784616091IMG-20260730-WA0018 टायर दुकान चालवू नको म्हणून मारहाण!मांडवगण फराटा येथील घटना! टायर दुकान चालवू नको म्हणून मारहाण करण्याची घटना मांडवगण फराटा येथे ! शिरूर,दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ | प्रतिनिधी| ” मांडवगण फराटा (शिरूर) येथे टायर दुकान चालवू नको म्हणून एका दुकानदारास दगडाने मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.” मांडवगण फराटा ता. शिरूर, जि. पुणे येथे टायर दुकान चालवू नको म्हणून झालेल्या वादातून एका दुकानदारास दगड व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात आरोपी किशोर शिवाजी कदम रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे याच्याविरुद्ध गुन्हा र. नं. 702/2025, BNS कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दत्तात्रय त्रिंबक काळे ,वय 40 वर्षे, रा. मांडवगण फराटा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. घटनेची वेळ 05 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारास 6.45 वाजता अशी आहे. फिर्यादी दत्तात्रय काळे यांचे “सिद्धी इंटरप्रायजेस” नावाचे टायर दुकान गावाच्या हद्दीत आहे. ते दुकानात काम करत असताना बाहेरून दगड फेकल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी बाहेर पाहिले असता आरोपी किशोर कदम हा त्यांच्या दुकानाच्या दिशेने दगड फेकत असल्याचे दिसून आले. फिर्यादी यांनी त्याला ‘तू दुकानाकडे दगड का फेकत आहेस?’ असा प्रश्न विचारल्यावर आरोपीने ‘तू दुकान चालू करू नकोस!’ असे सांगितले. या कारणावरून वाद वाढला. फिर्यादी यांनी ‘हे माझं दुकान आहे, मी चालू ठेवणार’ असं सांगितल्याने आरोपी संतापला व त्याने हातातील दगड फिर्यादीच्या डाव्या हातावर फेकला, त्यामुळे त्यांना दुखापत झाली. यानंतर आरोपीने कानशिलात मारून, लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच ‘तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली, असे फिर्यादी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार उबाळे व प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मांडवगण फराटा परिसरात संतापाचे वातावरण आहे. व्यापारी वर्गातही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन कवठे यमाईत दिवसाढवळ्या सोन्याचे दागिने लंपास शिरूर : हॉर्न वाजवण्यावरून तिघांकडून व्यावसायिकास मारहाण, जीव घेण्याची धमकी!