162334IMG-20260727-WA0478(1)WA_1783784616091IMG-20260730-WA0018 Contents1. Nitin Pawar कोण आहे हा माणूस?2. Nitin Pawar आणि सत्यशोधक ब्लॉग:3. प्रारंभिक जीवन आणि वैयक्तिक वाङ्मय—4. साहित्यिक आणि सर्जनशील योगदान—5. राजकीय आणि सामाजिक संघर्ष–6. सत्यशोधक ब्लॉग – Nitin Pawar : व्यासपीठ आणि वैशिष्ट्ये7. अभ्यास आणि अध्यात्मिक दृष्टिकोन8. आव्हाने, संघर्ष आणि भविष्यदृष्टी—8.1. ❤️ Support Satyashodhak Blog Nitin Pawar कोण आहे हा माणूस? 22 April 2026|लेख- अतिथी सम्पादक मा.मदन पवार, माजी, सीमाशुल्क अधिकारी,मुंबई, अतिथी सम्पादक Nitin Pawar आणि सत्यशोधक ब्लॉग: सत्याच्या शोधातील One Man Army अशी अनुभव, निरिक्षण, चिंतन आणि वैज्ञानिक कसोटीवर तपासून ठरवून वाटचाल करणारे आगळे वेगळे ज्याला Out Of Box अर्थात,’हटके’ पण,’नवनिर्मिती’करत वाटचाल करणारे Nitin Pawar हे एक व्यक्तिमत्व आहे. अनेक अवघड बाबी त्यांनी आधी बोलल्या आणि करुनही दाखवल्या. डॉक्टरेट मिळवूनच दाखवीन असे सागितले. Management मधे Doctorate in Management (D. M. S.) मिळवून दाखवली.’आरोग्य खाते व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य व मल्टिस्पेशालिटी हास्पिटल मेनेजमेन्ट ‘ यावर प्रबन्ध लिहून डॉक्टरेट मिळवली.’चालते बोलते विद्यापीठ बन’ असा सन्देश जेष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी दिला. तो पाळताना डॉ.नितीन पवार यांचे स्वतःचे ग्रन्थालय स्वतःच्या घरी कधी तयार झाले ते त्यांना समजले नाही.22+ पदव्या आणि 500+ National आणि International Certificates त्यांनी मिळवली. मराठी, हिंदी व इन्ग्लिश भाषेवर त्यांचे प्रभुत्व दिसुन येते. शालेय व collage जिवनात ते topper राहिले. गावाला challenge देवून दहावीला सर्व रेकॉर्ड मोडत पहिले येत शाळेच्या गुणवंत विद्यार्थी फलकावर कायमची नोंद केली.कुणीही सविन्दणे गावच्या माध्यमिक शाळेत आजही पाहू शकता. शिरुरकराना ते तसे फारसे परिचीत नाहीत. कारण ते आयुष्यातली 35 वर्ष शिरुर किंवा गाव सविन्दणे येथेही रहिवास न झालेले तर सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली, मुंबई येथे रहिवास झालेले आहेत. ‘बहुजन समाज पार्टी‘ चे मान्यवर कान्शीराम यांचा प्रभाव त्यांचावर कुमार वयात पडला. महाराट्रातील अनेक तरुणांनी कान्शीराम यांच्या प्रमाणे स्वतः त्याग करणे, स्वतः चा सन्सार व स्वतः ची सम्पत्ती करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. तशी करणारे Nitin Pawar हे एक तरुण होते. अनेक जण या प्रतिज्ञेपासून ढळले. पण नितीन पवार आजही ठाम आहेत.अर्थात ते महाराष्ट्राचे कान्शीराम होणे शक्य नव्हते.असेही ते सांगतात. कारण कान्शीराम देखील स्वतः सांगत असत की,’महाराष्ट्र के लोग बिकाऊ है’ और इसलिये वो कभी मोव्हमेन्ट मे नही आनेवाले है’ हे चांगले माहित असुनही Nitin Pawar यांनी महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी विचारांच्या लोकांसमवेत काम केले.बी एस पी असो, बामसेफ असो, नरेंद्र दाभोलकर असोत,काम्रेड शरद पाटील असोत,मेष्रामसाहेब असोत, अजित अभ्यन्कर असोत, डॉ.रावसाहेब कसबे असोत,डॉ. कुमार सप्तर्षी असोत,आम आदमी पक्ष व अरविंद केजरीवाल असोत,बार्टीच्या गावोगावी प्रबोधन कार्यात शिरुर व आम्बेगाव तालुक्यातील प्रत्येक गावाळा,उच्च माध्यमिक कालेज,बी फार्मसी कालेज अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन अन्धस्रद्धा निर्मुलन,समता,धर्मनिरपेक्षता,समाजवादी/साम्यवादी अर्थव्यवस्था,स्री मुक्ती,अनिष्ट प्रथा इ. बाबत लोकजागृती करत राहिले. ” मराठी न्यूज साईटवर प्रथमच English मधून अभ्यास पुर्ण व आन्तरराष्ट्रीय विषयावर लेखन….” ओपरेशन सिन्दुर… https://www.satyashodhak.blog/operation-sindoor-in-english/ डॉ.नितीन पवार हे केवळ एक पत्रकार किंवा लेखक नाहीत,तर सामाजिक न्याय,अध्यात्म, विज्ञान, तत्वज्ञान, मानवी भविष्याच्या शोध,गरीबी, बेरोजगारी, कृत्रिम बुद्धिमत्ता ते Quantum Physics इ.अनेक विषयांत त्यांचा व्यासन्ग आहे. त्यांचे www.satyashodhak.blog हे डिजिटल व्यासपीठ निर्भीड बातम्या,गहन विश्लेषण आणि सर्जनशील साहित्यासाठी लाखो वाचकांचे प्रिय ठरले आहे. 10 लाख वाचन views व 60+ देशातील वाचकापर्यन्त ते पोहोचले आहेत.कठीण मानले जाणारे,शेकडो तरुण ज्याचे Approval मिळवण्यासाठी धडपडतात ते Google Adsence चे Approval त्यांनी मिळवले आहे. जे Approval कृत्रिम बुद्धिमत्ता AI तपासते.त्या कसोटीला ते उतरले आहेत.Google ची मान्यता म्हणजे आन्तरराष्ट्रीय मान्यता मानली जाते.ती त्यांनी मिळवली. प्रारंभिक जीवन आणि वैयक्तिक वाङ्मय— डॉ.नितीन पवारांचे जीवन एखाद्या कादंबरीसारखे वेविद्यपूर्ण, संकटे आणि नाट्यमय घटनांनी भरलेले आहे.त्याचा परिचय शिरुरकराना आलाही.जी बातमी द्यायला पत्रकार सुद्धा घाबरतात.अशा बातम्या,स्टिन्ग ओपरेशन,पैशाची ओफर धुडकावणे,गरीबाच्या बातम्या देणे,आवाज उठवणे,गरीबाना मदतीसाठी सदैव तत्पर असतात.तेही निरपेक्ष भावनेने! शिरूर (पुणे जिल्हा) येथील या साध्या कुटुंबातील व्यक्तीने ‘हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये’डॉक्टरेट पूर्ण करून व्यवस्थापन क्षेत्रात यश मिळवले.मोठा व्यासंग असलेल्या त्यांनी विद्यापीठे आणि ‘स्वयम प्लॅटफॉर्म’ platform,भारत सरकार, वर २२+ विषयांचा अभ्यास केला आहे – विज्ञान, धर्म, अध्यात्म, conspiracy theories,Print and Broadcast Journalism, Genetic Engeering, Cell Biology, आंबेडकरवाद,कार्ल मार्क्स यांचा समावेश ज्यांत आहे.ओशो यांचे ते खास अभ्यासक व चाहते आहेत.आजही हा अभ्यास अखंड चालू आहे. https://www.linkedin.com/in/drnitinpawar त्यांचे वैयक्तिक जीवन भिष्म प्रतिज्ञेने वेढलेले आहे. – स्वतःचा परिवार किंवा संपत्ती न करण्याची प्रतिज्ञा त्यांनी पाळली आहे.अखंड जानसाधनेत बुडालेले हे पत्रकार गरीबांचे खरे पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ओशो रजनीश यांचे ते कट्टर चाहते असून,त्यांच्या तत्त्वज्ञानाने त्यांचे जीवन आकारले आहे.त्यांना जवळून सहवासातुनच समजले जाऊ शकते. ” मराठी न्यूज साईटवर प्रथमच हिंदी भाषेत वैचारिक लेखन—-बहस:जावेद अख्तर और मुफ्ती शमाईल…” https://www.satyashodhak.blog/javed-akhtar-vs-mufti-shamail-bahas/ इतर कोनताही अन्दाज ते पुराव्यासह फेल ठरवतात, असा लौकिक त्यांचा आहे.लेखक व्हायचे हे आधी सांगून ते करून दाखवले आहे.पाश्चिमात्य तत्वज्ञ सिगमन्ड फ्रायड, कार्ल मार्क्स, नित्शे, एन्गल्स, आर्थर मेकियावेली, देकार्ते, इम्यान्युअल कान्ट, स्टिफन होकीन्ग, इव्हाल नोआह हरारी, आईन्टाईन अशा एक से एक गुढवादी प्रज्ञावन्ताचे ते अभ्यासक आहेत. तसे स्वतः देखील त्यांनी जगून दाखवलेही आहे. आणि हो एक गोष्ट सांगायचीच राहिली. Nitin Pawar यांना विशेषतः हिंदी अजरामर गाणी गुणगुणण्याचा, बाथरुममधे गात्याचा,’नाद’ आहे. ही गाणी, सन्गीत 1980 ते 1984 या काळात रेडिओ, बिनाकामाला, मोठा बुशचा रेडिओ, लाऊड स्पिकर, चपट्या चकत्या गोल गोल फिरायच्या, गाने वाजायचे, थिएटर नव्हते कोयनेत. पण,’कुट्टो’चा व्हिडीओ चाले कोयनेत. कुट्टो हे पारशी कुटुंब कोयनेत होते. तिथे चित्रपट पाहण्याचा ‘नाद ‘लागला.अमिताभ बच्चनचा ‘खास’प्रभाव, कमरेवर हात ठेऊन,’बोलणे’, ‘दिवार’मधे! म्हणजे अगदी स्वप्नातला ‘नायक’ अमिताभ बच्चन बनला. https://youtube.com/shorts/JOph4GXC4pc?si=_clJnzJq2A86153w आज फिर तुम पे प्यार आया है….. ” तर Nitin Pawar यांनी 1000+ गाणी स्वतः StarMaker वर गायीली आहेत. अलिकडे यु ट्यूब Short’s मधे ते,’अभिनय’करु पहात आहेत. म्हणजे सगळच आगळे वेगळे.’चार लोक काय म्हणतील?’हा सर्वाना मोठा रोग!तो अशा किती तरी इच्छा, आकांक्षा, भावना दडपून टाकतो. जीवन कोरडं बनवतो. असे ते यावर मत देतात.” साहित्यिक आणि सर्जनशील योगदान— डॉ.नितीन पवार बहुआयामी प्रतिभावान आहेत. ‘माझी स्टोरी’ हे त्यांचे आत्मकथन,भविष्यकालीन मानवी समाजावर –’भविष्याचा जाहीरनामा’ या १०+ लेखामालेतुन लिहिले जात आहे.कथा, कविता ते लिहितात.चित्रकला (एटीडी) कलेतही निपुण आहेत. वाचनाचे आणि पुस्तकांचे मोठे संग्रह ते बाळगतात. निसर्गात ते रमतात. “भविष्याचा जाहीरनामा:महात्वाकान्क्षी लेखन प्रकल्प —“ https://www.satyashodhak.blog/bhavishyacha-jahirnama-1/ लहानपणाचा काळ कोयनेसारख्या ठिकाणी निसर्गरम्य अनुभुतीतुन गेल्याने ते तथाकथित अनेक प्रतिष्ठेच्या कल्पना धुडकावून लावतात.जे त्यांच्या पत्रकारी व भाष्यकारकी भूमिकेला आधार देते.अनेक महत्वाच्या व जागतिक विषयावर ते अधिकाराने लिहू शकतात.अगदी,’जेरुसलेम’ ते ‘किम दोन्ग उन’ पर्यंत माहितीपुर्ण भाष्य करतात. https://www.satyashodhak.blog/dr-nitin-pawar-editorials/ त्यांचे लेखन मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांतून यू.एस.ए. पासून व्हिएतनामपर्यंत ६०+ देशांत वाचले जाते.भारतापाठोपाठ युनाइटेड स्टेटस ओफ अमेरिका (USA) येथे त्यांचे वाचक आहेत. ‘विश्व मराठी परिषदेचे’ ते आजीवन संस्थापक सदस्य आहेत. याशिवाय त्यांच्या जीवनातील वेविध्यपुर्ण घटनांवर मोठा ग्रंथ लिहित आहेत. जो त्यांच्या कादंबरीसारख्या जीवनाचा दस्तऐवज असेल.विचारान्ची मान्डणी असणार आहे.विशेष म्हणजे ते कुणाचेही ‘अन्धभक्त’ नाहीत.अगदी महापुरुषांचे देखील ! कारण ती मानसिक गुलामगिरी सहज लक्षात येत नाही.पण मुलभुत आहे. राजकीय आणि सामाजिक संघर्ष– Nitin Pawar काहीही ‘अस्पृश्य’ नाही.त्यांनी सर्व नशा, पर्यटन, छन्द, भान्डणे, मारामाऱ्या,राजकारण, प्रेम, विरह, राजकीय जीवन सुद्धा ! म्हणून ते विधानसभा लढले.अनुभव व ‘आतील’ राजकीय वास्तव समजून घेता यावे,लोकशाहीत सामान्य माणूस देखील लोकप्रतिनिधीत्वासाठी लोकांकडे कौल मागू शकतो. याचे उदाहरण लोकांसमोर ठेवण्यासाठी!महत्वाचे हे की ओशो यांचा सन्देश – उपभोग घेऊनच तुम्ही तुम्ही उपभोगाच्या पलीकडे जावू शकता! अन्यथा ते उपभोग विकृत स्वरुपात विकसित होतात व बाहेर पडतात. स्वर्ग, स्वर्गात मद्याच्या म्हणजे दारुच्या नद्या, चीर तारुण्य, अप्सरा या कल्पना ब्रम्हचारी किंवा तथाकथित साधु सन्तान्च्या मनातील दडपलेल्या उपभोगाच्या भावनांचे प्रतिबिंब आहेत. असे ओशो यांचे मत दे तर्क युक्त पणे मान्डतात. निवडणुक काही बाबी सिद्ध करण्यासाठी लढले ! शिरुर हवेली विधानसभा निवडणूक Nitin Pawar यांनी दोन वेळा लढवली असून, आम आदमी पक्षाचे संभाव्य उमेदवार राहिले आहेत. जिल्हा पदाधिकारी म्हणूनही त्यांनी ‘आप’ चे काम केले आहे.राजकीय सत्ता सर्व प्रकारच्या परिवर्तनान्ची मास्टर चावी आहे, हे बाबासाहेब यांचे मत ते आवर्जून सांगतात. राजकारणात predictabal न राहणे हा धुरन्धर राजकीय नेत्याचा गुण प्रभावी ठरतो. असे ते निरिक्षण मान्डतात.ते मा.शरद पवार यांचे उदाहरण देतात. सहज जमेल ती व तेव्हडी जमेल तेवढी समाज सेवा त्यांनी केली आहे.अनेक क्रिकेट सामने गाजवले आणि मॅच विनर म्हणून ओळखले गेले.हा पैलू नाशिक, सातारा, कोल्हापूर च्या काळात बाहेर आला.शिरुरला येऊ पर्यंत क्रिकेटचे वय राहिले नाही.मानवी हक्कांसाठीच्या लढ्यातील सहभागही ते घेत आले आहेत. ” माझी स्टोरी ” : डिजिटल Periodicals मधे प्रथमच ‘मराठी दलित आत्मकथा ‘ … https://www.satyashodhak.blog/majhi-story-bhag-2/ ‘सत्यशोधक ब्लॉग’ वर शिरूर राजकारण, हिंदुत्ववाद,शिक्षण,आम्बेडकरवाद,आत्मचिन्तन, आत्मकथापर लेखन जे अनेकांच्या अनुभवान्चे प्रतिनिधित्व करत असते ते इ.विषयावर निर्भीड, थेट,बोल्ड लेखन ते करतात.हा ते एक ग्रन्थ मानताच. त्याचे अक्षरे, ओळी, विचार, वास्तव, विश्लेषण, सिद्धांत हे जसे सुचतील तसे भरत आहेत. Quora वरही हिंदी, मराठी,इन्ग्लिश मधून Nitin Pawar लेखन,(10 ते 25 लाख व्युज), Medium या आन्तरराष्ट्रीय platform वर लेख ( English ) प्रसिद्ध आहेत.त्यांचे’ऑपरेशन सिंदूर’ सारखे लेख राष्ट्रीय चर्चेत असतात.गरीबांचे पत्रकार म्हणून ते स्थानिक मुद्द्यांना वाचा फोडतात. सत्यशोधक ब्लॉग – Nitin Pawar : व्यासपीठ आणि वैशिष्ट्ये 2007 पासून आज पर्यंत,शिरूर वार्ता, सताजसत्ता,सत्यशोधक आवाज, महाराष्ट्र क्राईम न्यूज इ.मधे ते कार्यरत आहेत.ब्लॉगवर संपादकीय, बातम्या, मार्क्सिझम, AI टूल्स, ओशो, अम्बेडकर यावर लेख लिहीत आहेत.पान ११६ पर्यंत त्यांचे लेख उपलब्ध आहेत. इन्स्टाग्राम (@satyashodhakblog369) आणि लिंक्डइनवर सक्रिय असलेले हे व्यासपीठ प्रभावी डिजिटल पत्रकारितेचे ते उदाहरण आहेत.बाबासाहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक न्यायावर भर देणारे लेखन ते करतात. अभ्यास आणि अध्यात्मिक दृष्टिकोन आंबेडकर, कार्ल मार्क्स, ओशो, विज्ञान, धर्म, अध्यात्म आणि conspiracy theories उदाहरणार्थ एलियन्स, इल्युमिनाटी, Moon Landing Conspiracy, Pyramids etc. – हे विषय डॉ.नितीन पवारांचा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या भाष्याने वाचकांना नवे दृष्टिकोन मिळतात. भविष्यकालीन समाजावरील लेख हे त्यांच्या दूरदृष्टीचे लक्षण आहे. त्यांचा व्यासंग मोठा असून,पुस्तकसंग्रह हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.ओशोच्या तत्त्वांमुळे त्यांचे जीवन जानसाधना-केंद्रित आहे. आव्हाने, संघर्ष आणि भविष्यदृष्टी— डॉ. नितीन पवारांचे जीवन संकटांनी भरलेले आहे –आर्थिक, आरोग्य विषयक, एकाकी लढत,सामाजिक छुपा भेदभाव, अडथळे, राजकीय मते , सामाजिक विरोध, वैयक्तिक त्याग,धाडसी स्टिन्ग ओपरेशन्स, एक ना अनेक! तरीही ते अखंड लढतात.खरे विचार, अनुभव, भाष्य, पत्रकारिता, चिंतन आगामी काळात ‘सत्यशोधक’ मधून दिसेल असे ते सांगतात. ‘सत्यशोधक’ शब्दाची प्रेरणा विज्ञानातुन घेतली असल्याचे ते सांगतात. संपर्क: 7776033958- भविष्यात ब्लॉग अधिक विस्तारित होईल,नवीन ग्रंथ प्रकाशित होतील.त्यासाठी मटेरियल जमले आहे, असे ते सांगतात. अर्थात ऑनलाईन अमेझॉन वर!वगैरे. त्यांचे असे कार्य व जीवन वेगळ्या आयामाची ओळख समाजाला करुन देतात. लोकशाही आणि सत्याला बळकटी देतात. ‘सत्यशोधक ब्लॉग’ हे केवळ बातम्यांचे स्रोत नसून, विचारांचा ग्रन्थ बनवण्याचा ध्यास त्यांना आहे. तो सतत चौफेर दृष्टी टाकत राहील. विचार करायला भाग पाडणे, प्रश्न विचारायचे धाडस निर्माण करणे, सतत मानवी अस्तित्वाच्या सम्भाव्य शक्यता आणि सम्भाव्य सत्य, नेहमी माणवाला खुणावणारे, पण थांग न लागु देणारे- अन्तिम सत्य, altimate truth, प्रत्यक्ष ज्ञान, final destination की आणखीन काही?- त्याच्या जवळ पास पोचणे हेच मानवी conciousness चेतनेला अपेक्षित असावे !असे ते सांगतात.जीवनाचा उद्देश चेतन स्थितीद्वारे भवतालचे विश्व अनुभवने आणि शेवटी ते पुढील पिढीकडे देऊन अधिक उच्चतर अनुभुतीला उपलब्ध होणे हे असावे. असे ते तत्वज्ञान देखील मान्डतात. मानव हा परग्रही प्रगत सजिवानी पृथ्वी plant केला असण्याची शक्यता जास्त आहे, असे एक मत ते देतात. मानव व इतर प्राणी यांच्या मधील मोठी तफावत हे त्यामुळेच असावे, असा तर्क ते मान्डतात. ‘सत्यशोधक ब्लॉग : ने डिजिटल युगात सत्यशोधक वृत्ती जागवली आहे.डॉ.नितीन पवारांचे जीवन आणि कार्य प्रेरणादायी आहे – एखाद्या मोठ्या रचनेचे रूप आत दडलेले जे बाहेर येण्याची वेळ कदाचित आलेली आहे. त्यांच्या व त्यांच्या वाचकासाठी ! त्याच्या पुढील वाटचालीस मनापासून सूभेच्छा देतो. https://www.satyashodhak.blog/author/satyash_user/page/19/ ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन बालवधू वेश्या बनल्याची कथा शिरुरचा इतिहास आणि व्यक्तिमत्वे