Trupti Films परिवाराने सामाजिक एकतेचा संदेश देत कन्येचा शुभविवाह श्रीगोंद्यात संपन्न करत या निमित्ताने सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. आणि एक नवा पायन्डा पाडला आहे.वाचा सविस्तर… दिनांक 29 एप्रिल 2026 : श्रीगोंदा प्रतिनिधीमाजी आमदार माननीय पोपटराव गावडे यांच्यासह रामदास राऊत !Trupti Films च्या निर्मात्यांच्या कन्येचा शुभविवाह श्रीगोंद्यात थाटामाटात संपन्न झाला आहे या निमित्ताने Trupti Films परिवाराने सामाजिक एकतेचा संदेश देत एक नवा पायन्डा पाडला आहे.दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील गुरुकृपा लॉन्स येथे Trupti Films चे निर्माते, दिग्दर्शक व लेखक रामदास राऊत यांच्या कन्या सौ. तृप्ती यांचा विवाह सोहळा सोमनाथ लक्ष्मण जाधव यांचे उरुळी कांचन) चिरंजीव शुभम यांचाशी थाटामाटात व अत्यंत उत्साहात पार पडला.सांस्कृतिक वातावरण, आकर्षक सजावट आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे हा सोहळा उपस्थितांसाठी खास ठरला.या प्रसंगी शिरूरच्या माननीय नगराध्यक्षा माननीय सौ.ऐश्वर्याताई अभिजीत पाचरणे, माननीय खासदार निलेशजी लंके साहेब यांचे पितास्री माननीय श्री. ज्ञानदेव लंके गुरुजी , श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय राजेंद्र दादा नागवडे आणि आमदार माननीय बापूसाहेब गावडे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभाशिर्वाद दिले.मुंबईहून आलेल्या लेखिका व कवयित्री माननीय संध्याताई गायकवाड तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय सुरेशजी क्षीरसागर, नगरसेवक माननीय नितीन दादा पाचरणे, माननीय कॅप्टन थेऊरकर आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.खासदार माननीय भाऊसाहेब वाकचौरे, खासदार माननीय अमोल कोल्हे, आमदार माननीय बाबाजी शेट काळे व माजी आमदार माननीय अशोकराव पवार यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत आपली भावना व्यक्त केली.कार्यक्रमात सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी हजेरी लावली. साई समर्थ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय वसंतराव जगताप, संचालक माननीय संजय विश्वासराव, दिग्दर्शक माननीय काळुराम ढोबळे, तसेच विविध भागांतून आलेले कलावंत, अभ्यासक आणि मित्रपरिवार यांनी उपस्थिती दर्शवली. शाहीर रमेश खुडे, पापाबाई बोरगावकर, प्रा. संजय थोरात आणि राजेंद्र मोरे यांची उपस्थितीही विशेष ठरली.महापुरुषांचे आवर्जुन स्मरण!या सोहळ्यात Trupti Films चे प्रमुख रामदास राऊत आणि वरपिता सोमनाथ जाधव यांनी सर्वांचे स्वागत करत आभार मानले. महापुरुषांच्या विचारांचा आदर आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या विवाहातून देण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला वेगळे सामाजिक अधिष्ठान लाभले.राऊत आणि जाधव परिवारातील नातेवाईक, मित्रमंडळी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. आनंद, आपुलकी आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम असलेला हा विवाह सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील.Trupti Films च्या कलाकृती पहा—माझी बायको माझी मेव्हणी: हास्याची ट्रीट – Trupti Films Production च्या लघुपटाचे चित्रिकरण पुण्यात संपन्न ! दिग्दर्शक रामदास राऊत यांचा नवा चित्रपट घुंगरु , लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत व्यावहारिक जीवनातही प्रगतीशिल !About The Author Dr.Nitin Pawaradministratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनRanjangaon Police Traffic Action: 28 वाहनावर कालरवाई ,₹45,000 दन्ड वसुल! Shirur Atikraman Puran 19 : शिरूर अतिक्रमण पुराण – 19 :’ कही खुशी तो काही गम’!