System Failure Not Personal Failure ही माझ्या जीवनप्रवासातील भाग -7 आहे, जिथे मला स्पष्ट जाणवलं – System Failure Not Personal Failure. Contents1. परत येताना हलकं झालेलं मन2. दुसरं वादळ – आणि आप्पाची साथ :हे ही System Failure Not Personal Failure पण कसे?3. वर्ग, पैसा आणि सामाजिक बदल4. अभिमान, प्रेरणा आणि विसर पडणारी वेदना5. नाशिकचे फ्लॅशबॅक – विचारविश्वाचा विस्तार6. अभ्यास की भाषेची भिंत?7. प्रणालीतील अदृश्य रेषा (System Failure Not Personal Failure)8. पराभवाचं रूपांतर9. जात आणि मानसिकता10. वडिलांची सावली11. राग ते ऊर्जा12. ज्ञानाची प्रतिष्ठा13. प्रकाशाची झलक14. शेवट – पण प्रवास सुरूच14.1. About The Author14.1.1. Dr.Nitin Pawarपरत येताना हलकं झालेलं मनगावी परत आल्यावर सुरुवातीचे काही दिवस खूप हलके वाटले. कारण छातीवर सारखे येणारे दडपण आणि तसेच दडपण आप्पाला येत होते, ते गेले. आप्पासाठी मी सुरक्षित असणे म्हणजे त्यामागे एक विश्वास होता.पुढे जवळपास 10 वर्षांनंतर मी दारू पिऊ लागलो. त्यातून कुणीतरी घात केला. एक कार्यकर्ता तिथे जवळ राहत होता. तो मुंबई येथे वाढला होता. त्याला इंग्रजी चांगले येत होते. पण मार्क्स पडले नव्हते. ना सरकारी नोकरी, ना मेडिकल, इंजिनियर, ना शिक्षक होता आले. शेवटी मुंबई येथील घर विकून शिरूरला आला.निर्व्यसनी होता. तो खरे तर आप्पाचा तिरस्कार करत होता. तो रेशन धान्य दुकान चालवत असे. नंतर दोन नंबर करणे तो शिकला. पैसा येऊ लागला. त्याने काही केले की नाही केले? निश्चित पुरावा नाही.पण रात्री ती दारू पिल्यानंतर घसा आणि आतड्यात लांबपर्यंत आग आग झाली. घराबाहेर मित्राबरोबरच एका शाळेच्या व्हरांड्यात झोपत असे.दुसरं वादळ – आणि आप्पाची साथ :हे ही System Failure Not Personal Failure पण कसे?पुढे काय घडले? दुसरं मोठं तुफान थेट जगणेच संपवणारे इभे ठाकले. यावेळी देखील आप्पा होते.पुढे हे वादळ कसे पेलले? आणि सहीसलामत बाहेर कसा आलो? त्याचे तंत्र मी शोधले. मीच वापरले.आप्पा म्हणत – “मी असुपर्यंत मृदुला तुझ्याकडे फिरकू देणार नाही. आरोग्य खात्यात आयुष्य गेले आहे माझे. पण एक प्रकल्प गेला तरी दुसरा मोठा प्रकल्प पूर्ण करू. तुझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. आता आपण या व्यसनातून आधी बाहेर पडू. पडता येते. मी अनेकांना पार पोचलेले मागे आणले आहे. मी आहे. मी तुला मरू देत नाही.”वर्ग, पैसा आणि सामाजिक बदलपैसा आला की वर्ग बदलतो. कार्ल मार्क्स चे class म्हणतो मी.एका डॉक्टरचा, एका शिक्षकाचा, एका बँकरचा प्रसंग — गरीब बहुजन समाजातील कार्यकर्त्यांसाठी साधी लग्न पत्रिका, आणि Employees साठी सुंदर क्राफ्ट, धागे, मोरपिस असलेली भव्य पत्रिका.System Failure Not Personal Failure चे एक नमुनेदार उदाहरण.दोन्ही पत्रिका माझ्या हातात होत्या.मी विचारलं – हा फरक का? भेदभाव का? की वर्गांतर झाले की असे होते?उत्तर मिळाले – “सोडून द्यायच्या असल्या गोष्टी! पूर्वी खूप दारिद्र्य भोगलं आहे आपल्या समाजाने! थोडं आपले वैभव आता उच्च जातींना दिसू दे!”संक्रमणकाळ आहे – सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा. पण मनात विरोधाभास स्पष्ट दिसत होता.अभिमान, प्रेरणा आणि विसर पडणारी वेदनाआमच्या नात्यातील डॉक्टर यशवंत पवार, MBBS – तालुक्यातील पहिला MBBS. आमच्या घराण्याचा अभिमान.त्याच प्रेरणेने आज आठ-दहा डॉक्टर आमच्या नात्यात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आमच्या घराण्यात साकार होत होते.ही बाब मला आनंद देत होती. पण कधी कधी माझ्या स्वतःच्या वेदनेचा विसर पाडत होती.नाशिकचे फ्लॅशबॅक – विचारविश्वाचा विस्तारमन शांत असलं तरी प्रश्न शांत नव्हते. Flashback मध्ये मन नाशिकला जात असे.तेथील वातावरण, वाचन, साहित्य, गोदावरी घाट, वसंत व्याख्यानमाला, प्रा. शिवाजीराव भोसले, राम नगरकर, रा.सु. कसबे, नामदेव ढसाळ…रिपब्लिकन नेत्यांची सभा – प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, गवई, कवाडे, राजा ढाले…हे सर्व माझं विचारविश्व समृद्ध करत होतं.अभ्यास की भाषेची भिंत?माझं माध्यम मराठी. वाचन, लेखन, विचार सर्व मराठीत.पण मेडिकल कॉलेजमध्ये – Guyton, Gray’s Anatomy, Biochemistry चे प्रचंड ग्रंथ. इंग्रजी lecture स्पष्ट ऐकू न येणे.मी अभ्यासू होतो. पण भाषा अडथळा बनली.कोणी म्हणालं – “भाषा ही कौशल्य आहे, बुद्धिमत्ता नव्हे.” पण शब्दसंग्रह, कल्पनाशक्ती, वाचन – हे सर्व आवश्यक असते.मी स्वतःला दोष देत राहिलो.प्रणालीतील अदृश्य रेषा (System Failure Not Personal Failure)एक घटना – माझ्या batch मधील एक विद्यार्थी, अनुसूचित जातीचा, हुशार.त्याला practical मध्ये मुद्दाम कमी marks. वारंवार fail.एक दिवस – आत्महत्या.प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची जात वहीत नोंद केली होती.मी स्वतःला विचारलं – हे माझं वैयक्तिक अपयश आहे का? की ही खोल सामाजिक रचना आहे?तेव्हा मला उमगायला लागलं – System Failure Not Personal Failureपराभवाचं रूपांतरMBBS थांबलं. पण शिक्षण थांबलं नाही.इतिहास, तत्वज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान वाचत राहिलो.मी स्वतःला सांगितलं – “मी शरीराचं नव्हे, विचारांचं शल्यचिकित्सक बनेन.”जात आणि मानसिकतासमाजाचा चेहरा – वरून दयाळू, आतून जातीनुसार बदलणारा.लोक मदत करतात, पण अट ठेवतात – “वर जाऊ नको आमच्या.”मी ठरवलं – मी स्वतःचा आवाज निर्माण करणार.वडिलांची सावलीवडील मला “बाळासाहेब” म्हणायचे.ते म्हणत – “तू कुठेही गेलास तरी इतिहास घडवशील.”त्या वाक्याने माझ्यात बदल होत असे.राग ते ऊर्जामी बोलायला लागलो. Scientific logic, global संदर्भ देऊ लागलो.लोक म्हणाले – “तुम्ही hypnotize करता.”तो hypnotize नव्हता. तो अभ्यास होता. आत्मविश्वास होता. अन्यायाविरुद्धचा स्वर होता.ज्ञानाची प्रतिष्ठापैसा प्रतिष्ठा देत नाही. ज्ञान देतं.मी ठरवलं – ज्ञान कमवायचं. आवाज घडवायचा. One Man Army बनायचं.प्रकाशाची झलकएक दिवस जाणवलं – मी रागावलेलो नाही… मी जागा झालो आहे.मी मोठा झालो होतो – वयाने नव्हे, अनुभवाने.शेवट – पण प्रवास सुरूचMBBS थांबलं. पण विचारांची यात्रा सुरू झाली.पराभवाची राख उरली होती… त्यातूनच अंगार निर्माण झाला.आधीचे भाग:Mazi Story : माझी स्टोरी – भाग 6:“अपयश नाही, परिवर्तन होतं! माझ्या विचारांचा नवा जन्म”माझी स्टोरी : आत्मकथा भाग 1 – कोयना आणि बालपणAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनMazi Story : माझी स्टोरी – भाग 6:“अपयश नाही, परिवर्तन होतं! माझ्या विचारांचा नवा जन्म” Samrat Ashok Jayanti : जांबुत येथे चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी