people paying tribute to leaders with garlanded portraits during night event Maharashtra jayanti celebrationMaharashtra Jayanti Tribute: स्थानिक कार्यकर्त्यांकडून नेत्यांना हार अर्पण करून अभिवादन

Samrat Ashok Jayanti Jambut News

Summary-

  • जांबुत(शिरुर तालुका ) येथे त्रिरत्न मैत्रेय सेवा संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक जयंती प्रथमच मोठ्या उत्साहात साजरी.
  • सम्राट अशोक, भगवान बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, त्रिशरण पंचशील पठण व प्रबोधनात्मक भाषणे आयोजित.
  • गावातील नागरिक, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; सामाजिक एकोप्याचा व समतेचा संदेश देणारा कार्यक्रम.
Samrat Ashok Jayanti
(जांबुत येथे त्रिरत्न मैत्रेय सेवा संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते)

Samrat Ashok Jayanti चा जांबुत (ता. शिरुर) येथे त्रिरत्न मैत्रेय सेवा संघ जांबुत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जांबुत आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त प्रथमच मोठ्या उत्साहात साजरा झाला.मोठ्या भक्तिभावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील नागरिक, महिला, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक जयंती सोहळ्याला विशेष रंगत आणली.

प्रतिनिधी| दिनांक 26 मार्च 2026

जांबुत (ता. ___) येथे त्रिरत्न मैत्रेय सेवा संघ जांबुत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जांबुत व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त प्रथमच भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. हा  Samrat Ashok Jayanti  जयंती सोहळा संस्मरणीय केला.

सम्राट अशोक यांच्याबद्दल अधिक माहिती येथे वाचा”

Samrat Ashok Jayanti  कार्यक्रमाची सुरुवात सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी श्रद्धेने दीपप्रज्वलन केले. त्रिशरण पंचशीलाचे पठण केले. या प्रसंगी उपस्थितांनी “बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि” असा घोष देत वातावरण भारावून टाकले.

बौद्ध धम्माचा इतिहास जाणून घ्या

कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, सम्राट अशोक हे एक महान शासक होते. इ. स. पुर्व 300 च्या आसपासचा त्यांचा कालखन्ड आहे. ते मानवतावादी, शांततावादी व बुद्धधाच्या धम्माचे प्रसारक होते. कलिंग युद्धानंतर त्यांनी हिंसेचा त्याग केला.युद्धातील हिंसा पाहून ते व्यथित झाले.त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.पुढे संपूर्ण जगात शांतता, बंधुता व अहिंसेचा संदेश दिला. त्यांच्या राज्यकारभारात न्याय, समता व सर्वधर्मसमभाव यांना विशेष महत्त्व देण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही सम्राट अशोकांच्या धम्मतत्त्वांचा स्वीकार केला.भारतीय समाजाला नवी दिशा दिली, असेही वक्त्यांनी नमूद केले. अशोकांनी रुजवलेली समता आणि बंधुतेची मूल्ये आजच्या समाजात अधिक आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी उपस्थितांना या विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले. ‘ युद्ध नव्हे तर बुद्ध’ आजची गरज असल्याचे सांगितले.

महिला मंडळाच्या वतीनेही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्यात आला. माता रमाई महिला मंडळाच्या सदस्यांनी समाजातील महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. Samrat Ashok Jayanti निमित्ताने अशा ऐतिहासिक कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये जागृती निर्माण होते. असे मत व्यक्त केले. त्यांनी भविष्यातही Samrat Ashok Jayanti उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी युवकांनीही पुढाकार घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सामाजिक एकोप्याचा संदेश देत गावातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला. ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

या जयंती सोहळ्यामुळे जांबुत गावात प्रथमच सम्राट अशोक यांच्या विचारांची जागृती मोठ्या प्रमाणात झाली. आयोजकांनी सांगितले की, पुढील काळातही सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा मानस आहे.

एकूणच चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीच्या निमित्ताने जांबुत येथे झालेला हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, बंधुता व प्रबोधनाचा एक आदर्श ठरला. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा यशस्वी ठरला. भविष्यातही अशा कार्यक्रमांची परंपरा कायम राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

सम्राट अशोक आणि बौद्ध धम्म:

चक्रवर्ती सम्राट अशोक हे मौर्य साम्राज्याचे, राजधानी मगध ( आजचे बिहार- पाटणा) एक महान व प्रभावशाली शासक होते. त्यांच्या कारकीर्दीत भारताचा मोठा भूभाग एका छत्राखाली आला होता. सुरुवातीला अशोक हे पराक्रमी व विस्तारवादी राजा होते.परंतु इ.स.पू. 261 मधील कलिंग युद्धानंतर त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. या युद्धात झालेल्या प्रचंड रक्तपातामुळे ते व्यथित झाले. त्यांनी हिंसेचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर सम्राट अशोकांनी आपल्या राज्यकारभारात अहिंसा, करुणा, दया व सत्य या मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांनी प्रजेसाठी न्याय्य व मानवतावादी धोरणे राबवली. अशोकांनी “धम्म” या संकल्पनेचा प्रचार करत लोकांना नैतिक जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले.त्यांनी भारतासह श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान व इतर आजच्या पुर्वेकडील बहुतांश  देशांमध्ये बौद्ध धम्माचा प्रसार केला.चीन पासून जपान, मलेशिया इ. पर्यंत आज बुद्ध अनुयायी आहेत.

सम्राट अशोकांनी विविध ठिकाणी स्तूप, विहार व शिलालेख उभारले. धम्माचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या शिलालेखांमधून सामाजिक समता, धार्मिक सहिष्णुता व नैतिक मूल्यांचा प्रचार दिसून येतो. त्यामुळे सम्राट अशोक हे केवळ एक महान शासक नव्हते, तर ते मानवतेचा संदेश देणारे जागतिक स्तरावरील आदर्श नेते ठरले.

Read more >>>>>

Dr.Babasaheb Ambedkar यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या ५ रंजक गोष्टी : एक सखोल लेख

Babasaheb Ambedkar;मोक्याच्या आणि मार्याच्या; जागा कोनत्या व का ? : भाग : 1

Babasaheb Ambedkar ;मोक्याच्या आणि मार्याच्या; जागा कोणत्या  व का ? : भाग : 2

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support