Advertisement Shirur Crime Amdabad Tranformer Theft घटनेत शिरूर तालुक्यातील आमदाबाद परिसरात दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरीची घटना घडली आहे. पिडीताचे 80 हजारांचे नुकसान झाले आहे.सविस्तर बातमी पुढे वाचा…. Contents1 Shirur Crime Amdabad Tranformer Theft : दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरची चोरी2 Shirur Crime Amdabad Tranformer Theft माशेरेमळा, आमदाबाद येथून!3 १००/२२ केव्हीए क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली पाडले !4 वरिष्ठ तंत्रज्ञ उत्तम वाल्मीक गाडेकर यांनी फिर्याद दिली !5 शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!5.1 महावितरणला भेट द्या—-5.2 आणखीन बातम्या वाचा—-5.3 About The Author5.3.1 Dr.Nitin Pawar5.4 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Crime Amdabad Tranformer Theft : दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरची चोरी शिरूर ,7 जुलै 2026 शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील माशेरेमळा परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shirur Crime Amdabad Tranformer Theft माशेरेमळा, आमदाबाद येथून! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते दि. ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत मौजे माशेरेमळा, आमदाबाद येथील गट क्रमांक ८१ च्या हद्दीत ही घटना घडली. १००/२२ केव्हीए क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली पाडले ! अज्ञात चोरट्यांनी लोखंडी स्ट्रक्चरवर बसविण्यात आलेले दोन १००/२२ केव्हीए क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली पाडले. यामुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल सांडून नुकसान झाले. त्यानंतर चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ उत्तम वाल्मीक गाडेकर यांनी फिर्याद दिली ! चोरीस गेलेल्या दोन ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची एकूण अंदाजे किंमत ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी महावितरणच्या टाकळी हाजी शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ उत्तम वाल्मीक गाडेकर यांनी फिर्याद दिली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल! या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१८/२०२६ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत. महावितरणला भेट द्या—- https://www.mahadiscom.in/ आणखीन बातम्या वाचा—- Shirur Missing Woman Case : मोराची चिंचोली येथील 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; शिरूर पोलिसांकडून शोध सुरू Breaking Shirur Crime : शिरूरमध्ये 24.38 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल Shirur Woman Accidental Death: न्हावरा येथील 34 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू Advertisement About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Missing Girl Case: क्लासला सोडल्यानंतर 20 वर्षीय तरुणी बेपत्ता; शिरूर पोलिसांत नोंद