‘ह्युमन राईट्स’ च्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग लगद निर्वी रोड येथे अखेर गतिरोधक मंजुर ! Rights
'ह्युमन राईट्स' च्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग लगद निर्वी रोड येथे गतिरोधक मंजुर अखेर झाला आहे. ह्युमन राईट्स फाऊंडेशन ऑफ इंडियाचे राजेंद्र कुलथे यांनी केला अथक पाठपुरावा केल्यानंतर हे यश त्यांना मिळाले आहे. त्यामुळे निर्वी गावच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.शिरुर तालुक्यातील निर्वी हे गाव आहे.
‘ह्युमन राईट्स’ च्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्गालगदचा निर्वी रोड येथे अखेर गतिरोधक मंजुर !
‘ह्युमन राईट्स’ चे राजेंद्र कुलथे यांनी केला अथक पाठपुरावा !
शिरुर,दि.8जुलै : (राजेंद्र कुलथे,निर्वी यांच्या कडुन)
‘ह्युमन राईट्स’ च्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग लगद निर्वी रोड येथे गतिरोधक मंजुर अखेर झाला आहे. ह्युमन राईट्स फाऊंडेशन ऑफ इंडियाचे राजेंद्र कुलथे यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यानंतर हे यश त्यांना मिळाले आहे. त्यामुळे निर्वी गावच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शिरुर तालुक्यातील निर्वी हे गाव आहे.
स्पिड ब्रेकर चे काम सुरू !
‘ह्युमन राईट्स फाऊंडेशन ऑफ इंडिया कडुन पाठपुरावा. ..
ह्युमन राईट्स फाऊंडेशन ऑफ इंडियाचे (मानवाधिकार ) समन्वयक महाराष्ट्र राज्य राजेंद्र कुलथे यांच्या पाठपुराव्यामुळे NH548 राष्ट्रीय महामार्गावरील निरवी जिल्हा परिषद शाळा व तात्यासाहेब सोनवणे हायस्कूल व इतर ठिकाणी स्पीड ब्रेकरच्या कामाला आज सुरुवात झाली आहे.
‘संपादकिय टच’ :
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
येथे असलेली मानवी हक्क संघटना ही एक स्वतंत्र नोंदणी असलेला संटना पण मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्थापन झालेली एक संघटनाआहे.अशा या कार्यासाठी स्थापित अनेक संघटना आहेत.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनिसेफने जगातील सर्व मानवांना असणार्या हक्काची जी संकल्पना मांडली आहे. त्यावरच या संघटना निर्माण झालेल्या आहेत.
मानवी हक्क कोनते आहेत ? ——-
मानव हा पृथ्वीवरील अनेक प्राण्यांपैकी एक प्राणी आहे.मात्र विवेक व बुद्धिमत्ता मानवामधे उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये विशेष गुण म्हणुन विकसित झाले आहेत.हे लक्षात घेऊन जागतिक पातळीवर याचा विचार होवून मानवाने त्याचे व इतर सर्व प्राण्यांच्या हितासाठी संयुक्त राष्ट्रसंघ United Nation च्या युनिसेफने असे सर्व हक्क कोनते याचा मसुदा तयार केला.त्यानुसार जगातील प्रत्येक व्यक्तीला काही मुलभूत व नैसर्गीक असावेत व त्यांचे पालन जगातील सर्व देशांनी करावेत.ते आमलात आणावे असे ठरवले.ते सर्व देशांनी ते मान्य करुन अंमलबजावणी करावी,असे ठरवले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत.
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
1.’सर्वत्र व अविभाज्य’ मानवी हक्क :
मानवी हक्क सार्वत्रिक आणि अविभाज्य आहेत. जगात सर्वत्र सर्व लोकांना त्यांचे हक्क आहेत. त्यांना कोणीही स्वेच्छेने सोडू शकत नाही. किंवा इतर त्यांना त्याच्यापासून किंवा तिच्यापासून दूर करू शकत नाहीत.
2.अविभाज्यता :
मानवी हक्क संघटना अविभाज्य आहेत. नागरी, राजकीय, आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक स्वरूपाचे असोत, ते सर्व प्रत्येक मानवी व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या अंगभूत असतात. परिणामी, त्या सर्वांना अधिकार म्हणून समान दर्जा आहे. ‘छोटा’ हक्क असं काही नाही. मानवी हक्कांची कोणतीही श्रेणीबद्धता नाही.
3. परस्परावलंबन आणि परस्परावलंबन :
एका हक्काची प्राप्ती बहुतेकदा संपूर्ण किंवा अंशतः इतरांच्या प्राप्तीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, आरोग्याच्या अधिकाराची प्राप्ती शिक्षण किंवा माहितीच्या अधिकाराच्या प्राप्तीवर अवलंबून असू शकते.
4. समानता आणि भेदभाव न करणे :
कारण प्रत्येक मानवाला जन्मजात प्रतिष्ठा असते, सर्व लोक सहमानवासारखे समान असतात. वंश, रंग, लिंग, वय, भाषा, धर्म, राजकीय दृष्टीकोन, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूळ, अपंगत्व, मालमत्ता, जन्म किंवा इतर कोणतेही स्थान यासारख्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, सर्व लोक त्यांच्या मानवी हक्कांसाठी पात्र आहेत. मानवाधिकार करार संघटनांनी स्पष्ट केले. सहभाग आणि समावेश मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याची जाणीव करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक लोकांना सक्रियपणे, मुक्तपणे आणि अर्थपूर्णपणे सहभागी होण्याचा, योगदान देण्याचा आणि नागरी, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. वैधता आणि उत्तरदायित्व मानवी हक्क साधने कायदेशीर मानदंड आणि मानके समाविष्ट करतात ज्यांचे राज्य आणि इतर जबाबदारी धारकांनी पालन केले पाहिजे.”
शिरूर तालुक्यामधील पूर्व भागातील राजकीय क्षेत्रातील महत्वाचे व्यक्तिमहत्व असणारे निर्वी गाव येथील ह्युमन राइट्स फाऊंडेशन ऑफ इंडियाचे समन्वयक राजेंद्र कुलथे यांनी तळेगाव चाकण न्हावरे – उरळगाव रोड राष्ट्रीय महामार्ग , निर्वी रोड NH- ५४८ D वरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्वी, तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय व मारुती मंदिर निर्वी येथे स्पीड ब्रेकर, सूचना फलक व सिग्नलची व्यवस्था करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना यांच्याशी अनेक वेळा पत्रव्यवहार करून निर्वी गावातील NH548D राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर साठी प्रयत्न करून स्पीड ब्रेकर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. आज अखेर या ठिकाणी स्पीड ब्रेकरचे काम सुरू करण्यात आले आहे.
संदर्भ पत्र
परिसरात आहे शालेय भाग…..
संदर्भ पत्रात स्पष्ट केल्याप्रमाणे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रकल्पाच्या सर्व ठिकाणी गावाच्या भागात आणि रस्त्याच्या शालेय भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी तसेच शिरसगाव काटा व इनामगाव भागातील अपूर्ण राहिलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला कळवण्यात आले होते . तसेच तेथील अधिकाऱ्यांनी रस्त्यावर लवकरच गतिरोधक बसवण्याचे लेखी आश्वासित केले होते. त्यामुळे आज प्रत्यक्षात स्पीड ब्रेकरच्या कामाला सुरवात झाला आहे .
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल निर्वी परिसरातील नागरिकांकडून व पालकांकडून समाजसेवक राजेंद्र कुलथे यांचे अभिनंदन करण्यात आले.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com