
Contents
Missing Girl 18 Years : शिरूर : पिंपरखेड येथील 18 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता – कुटुंब चिंतेत !
Missing Girl 18 Years Shirur Pimperkhed
शिरूर, 2 जून 2025 | सत्यशोधक न्युज |
“Missing Girl 18 Years : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातून 18 वर्षीय शेफाली संतोष मोरे ही अचानक बेपत्ता झाली आहे. कुटुंबीय चिंतेत असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. शेफालीबाबत माहिती असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन.”
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातून 18 वर्षांची मुलगी शेफाली संतोष मोरे ही अचानक बेपत्ता ( Missing Girl 18 Years ) झाल्याची घटना समोर आली आहे. तिच्या वडिलांनी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली आहे. यामुळे संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मुलीचा तपशील खालीलप्रमाणे आहे—-
नाव: (नाव गुप्तता )
वय: 18 वर्षे 3 महिने
राहणार: पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे
उंची: 5 फूट 2 इंच
वर्ण: गोरा
वेशभूषा: काळ्या रंगाची प्लाझो पँट, गुलाबी टी-शर्ट, कानात बनावट कर्णफुले, पायात साधी चप्पल
इतर माहिती—-
डाव्या हाताच्या चौथ्या बोटात चांदीची अंगठी, सोबत दोन साड्या, मेकअप बॉक्स आणि तिचे आधार कार्ड नेले आहे. ती मराठी व हिंदी भाषेत बोलते.
घटनेचा तपशील—-
दिनांक 1 जून 2025 रोजी संध्याकाळी 7.35 ते 7.46 वाजण्याच्या दरम्यान शेफाली तिच्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. वडील संतोष वामन मोरे ,वय 47 वर्षे, व्यवसाय -शेती, यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळेस ते बाजारात गेले होते आणि त्यांच्या पत्नीने 7.46 वाजता फोन करून सांगितले की मुलगी घरात नाही. नंतर तिच्या नातेवाइकांसोबत शोध घेतला गेला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही.
पोलीस तपास–

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मानव मिलिंग रजिस्टर नं 89/2025 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपास अधिकारी: पो.ह. वारे
दाखल अधिकारी: ह.वा. टेंगले
प्रभारी अधिकारी: चिवडशेट्टी, शिरूर पोलीस स्टेशन
लोकांना विनंती—
वरील वर्णनाची मुलगीचा कुठेही शोध लागल्यास किंवा काही माहिती असल्यास कृपया शिरूर पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा किंवा संतोष मोरे (मोब: 8830683674) यांना कळवावे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना —
https://mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://www.missingpersonhelpline.org – मिसिंग पर्सन हेल्पलाईन
https://pune.gov.in – पुणे जिल्हा प्रशासन
https://www.ncpcr.gov.in – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (जर अल्पवयीन असल्यास उपयुक्त
सत्यशोधक न्युज मधील आणखीन बातम्या वाचा —-
Shirur Rod Attack at Marriage Function : शिरूर: विवाह समारंभात रॉडने हल्ला!