Missing Girls Shirur Pune news image - SatyaShodhak Blogशिरूर तालुक्यात दोन तरुण मुली गायब; पोलीस शोध कार्यरत"

Missing Girls Shirur Pune : मिसिंग मुलींची माहिती, शिरूर पोलिसांचा तपास सुरु

16 मे 2026

Missing Girls Shirur Pune लागोपाठ दोन तरुणी बेपत्ता/missing होणे ही बाब गम्भीर आहे.शिरुर पोलीस कसोसीने तपास करत आहेत.

शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी धक्का देणारी घटना घडली आहे. दोन तरुण मुली अचानक घरातून निघून गेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांना ती सापडलेली नाही. शिरूर पोलीस स्टेशनने याबाबत तातडीने नोंदणी केली आहे. तपास सुरू आहे. या घटनांनी स्थानिक समाजात चिंता पसरवली आहे.

Missing Girls Shirur Pune – पहिली घटना:

👉 x Y. गुप्ता, ( नाव गुप्तता) वय- 20 वर्ष, पांढरे व निळ्या रंगाचे पंजाबी ड्रेस घातलेला आहे. तिचे केस काळे लांब व डाव्या डोळ्यावर जुना जखम आहे. ही तरुणी सि टी बोरा कॉलेज शिरुर मध्ये शिकत होती. दिनांक 30/04/2026 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ती शिरूर येथून निघून गेली. आजपर्यंत तिचा कुणालाही काहीही ठाव लागलेला नाही. असे कुटुंबियांनी सांगितले आहे.

• वय: 20 वर्षे

• रंग: गोरी

• केस: काळे, लांब

• भाषा: हिंदी, इंग्रजी, मराठी

• शिक्षण: 14 वी

• पोलीस रजि. नं: 67/2026

कुटुंबियांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली आहे.पोलीस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास शिरुर पोलीस करीत आहेत.

दुसरी घटना:

ही दुसरी घटना देखील शिरूर तालुक्यातच घडली. X P वाळुंज,(नाव गुप्तता) वय – 21 वर्ष, अंगाने सडपातळ, सावळ्या रंगाची, निळा शर्ट व काळी पेट घालून शिरूर बसस्थानकाहून निघून गेली. तिच्या कुटुंबियांनी सांगितले की ती कोणालाही न सांगता अचानक गेलेली आहे.आजपर्यंत तिचा कुठेही ठाव लागलेला नाही.

• वय: 21 – वर्षे

• केस: काळे, लांब

• भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी

•’शिक्षण: इलेक्ट्रिक इंजिनिअरींग

• पोलीस रजि. नं: 68/2026

पुढील पोलीस तपास सुरू असून, पो. हवा.मुंढे व पो.हवा.कोथळकर हे तपास करीत आहेत.

स्थानिक पोलिसांनी उचललेली पावले—

• दोन्ही प्रकरणांची नोंद तातडीने झाली आहे.

• शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने प्रत्येक शक्यतेवर शोध सुरू केला आहे.

• कुटुंबियांनी नागरिकांना मदत करण्याची विनंती केली आहे.माहिती मिळाल्यास पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तपत्रांद्वारे माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

💡वाचकाना सहाय्यक  लिंक्स :

http://Missing Children India – राष्ट्रीय बाल गायब डेटाबेस

National Crime Records Bureau – पोलिस अहवाल

Childline India – तातडीची मदत

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q1: पहिली आणि दुसरी दोघी किती दिवस गायब आहेत?

पहिली : दिनांक 30/04/2026 पासून, दुसरी : दिनांक 14/05/2026 पासून. दोघीही आजपर्यंत सापडल्या नाहीत.

Q2: पोलीस स्टेशनमध्ये नोंद कशी आहे?

• पहिली: रजि. नं 67/2026

• दुसरी : रजि. नं 68/2026

Q3: कुटुंबियांनी काय उपाय केले?

• स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तातडीने अर्ज केला आहे.

• सोशल मीडिया आणि स्थानिक समुदायातून शोध सुरू आहे.

Q4: माहिती मिळाल्यास कुठे संपर्क करावा?

• शिरूर पोलीस स्टेशन: Pune Rural Police

• तातडीची मदत: 100 किंवा स्थानिक हेल्पलाइन नंबर

Q5: दोन्ही मुलींच्या शोधात सामान्य नागरिक कसे मदत करू शकतात?

• जर कुणाला तरुणीची माहिती मिळाली, तर तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

• सोशल मीडिया पोस्ट शेअर करून माहिती पसरवणे.

अधिक सत्यशोधक बातम्या /शिरुर बातम्या वाचा–

Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई

Shirur Crime: गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे शिक्षक मारहाण प्रकरण; आदर्श शाळेवर अन्यायाचा काळा डाग?

Shirur Crime News : गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन प्रकरणे दाखल, एक महिला आरोपी!

About The Author