IMG 20260727 WA0560

Shirur Crime : कुख्यात गुंड योगेश मचाले टोळीवर MCOCA; विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी

शिरूर, पुणे : 27 जुलै 2026

शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक 235/2026 मधील कुख्यात गुंड योगेश केशव मचाले व त्याच्या संघटित गुन्हेगार टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली आहे.

या प्रकरणात क्रिकेट स्पर्धेच्या वादातून फिर्यादीवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्याचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्रांचा वापर तसेच संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये टोळीचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान टोळीतील अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर योगेश मचाले हा मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त तपासात या टोळीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दरोडा आदी गंभीर स्वरूपाचे एकूण 27 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्यास मंजुरी मिळाली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.