Shirur Crime Police Action News : Shirur Police registered a case after seizing 9 litres of illegal country liquor at Alegaon Paga village in Pune district.आळेगाव पागा येथे ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त; एकावर गुन्हा दाखल.

Shirur Crime Police Action News मधे आलेगाव पागा येथे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.एकावर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर बातमी पुढे वाचा….

शिरूर , 13:जुलै 2026

शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर शिरूर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

Shirur Crime Police Action News : पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग रघुनाथ कोकरे,राहणार- आलेगाव पागा, तालुका- शिरूर हा आपल्या राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिरुर पोलीसांकडून तेथे छापा टाकण्यात आला.

शिरर पोलीसांच्या या कारवाईत 9 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली. जप्त मालाची किंमत 900 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद—

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात  आला आहे. रजिस्टर क्रमांक 641/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला बीएनएसएस कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

Read more》》》》

Breaking Shirur Crime: महाशिवपुराण कथेदरम्यान महिलेचा संशयास्पद मृत्यू — सत्य दडपले जात आहे का?

Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई

About The Author