Inamgaon Accident : इनामगाव येथे भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.इनामगाव येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा.
Advertisement
Advertisement

16 July 2026

Inamgaon Accident घटनेत इनामगाव येथे भीषण अपघात झाला आहे.दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर अज्ञात चालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Inamgaon Accident : न्हावरे–काष्टी रोडवर हा भीषण अपघातात!

शिरूर, दि. १६ जुलै : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील न्हावरे–काष्टी रोडवर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी ग्रँड विटारा कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement

Inamgaon Accident : रामेश्वर भगवान राठोड जखमी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घाडगेमळा येथील वळणावर हा अपघात झाला.

जखमी रामेश्वर भगवान राठोड (वय २७) हे त्यांच्या शाईन दुचाकी (एमएच २३ बीआर ४८५३) वरून इनामगावहून काष्टीकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या ग्रँड विटारा (एमएच १६ डीएम ६१६२) या कारच्या अज्ञात चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली.

Inamgaon Accident मधे रामेश्वर राठोड यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

जखमीच्या वडिलांनी भगवान प्रभु राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Inamgaon Accident  प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खबाले करीत आहेत.

आणखीन बातम्या वाचा—-

Missing Woman Shirur : शिरूरमध्ये 52 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Shirur Rural Crime : उरळगाव येथे 14 लिटर गावठी दारूसह एकाला अटक

Shirur Murder Case 2026 : शिरूरमधील खून प्रकरणी सात आरोपींना अटक; 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी!

WA 1783784616091
Advertisement

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात.

You missed