E20 Petrol Protest Pune : Aam Aadmi Party workers taking out a symbolic funeral procession of a motorcycle in Shirur to protest against mandatory E20 ethanol blended petrol.ई 20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात आम आदमी पार्टीने शिरूरमध्ये दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन केले.
Advertisement
Advertisement

पुणे, दि. १६ जुलै 2026

E20 Petrol Protest Pune :  ई 20 पेट्रोलच्या सक्तीविरोधात आम आदमी पार्टी ‘चे पुणे येथे आंदोलन झाले.यावेळी गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.सविस्तर बातमी वाचा…

E20 Petrol Protest Pune:20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची सक्ती?

पेट्रोल पंपांवर ई 20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलची सक्ती केल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीने शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. बसंत बहार टॉकीज येथील पेट्रोल पंपापासून गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेऊन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement
Advertisement

E20 Petrol Protest Pune: राम नाम सत्य हैं, आम जनता त्रस्त हैं, नितीन गडकरी मस्त हैं”

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “राम नाम सत्य हैं, आम जनता त्रस्त हैं, नितीन गडकरी मस्त हैं” अशा घोषणा दिल्या.

आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ई20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज 5 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचा तसेच इंजिनच्या भागांवर परिणाम होऊन दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याचा दावा केला.

वाहनानुसार इंधन निवडण्याचा पर्याय द्यावा : मागणी

ग्राहकांना शुद्ध पेट्रोल (ई0 किंवा ई10) उपलब्ध करून द्यावे, ई20 पेट्रोलची किंमत कमी ठेवावी आणि वाहनानुसार इंधन निवडण्याचा पर्याय द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

तसेच जुन्या वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च भरून द्यावा किंवा वाहन उत्पादक कंपन्यांनी मोफत दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

आंदोलनात ‘आप’चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई सामील!

E20 Petrol Protest Pune : आंदोलनात आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांच्यासह किरण साळोखे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

आणखीन राजकीय बातम्या वाचा—-

शिरूर राजकारण : सर्व बातम्या आणि विश्लेषण

Aam Aadmi Party;आप मे है दम ! दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील ;आप; च्या पुनरागमनाची खूण/ चाहूल!

Aap Pune News : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड

WA 1783784616091
Advertisement

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात.

You missed