Advertisement Karade Firing ? : करडे येथे तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर, दि. १८ जुलै शिरूर तालुक्यातील करडे येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २३ वर्षीय तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने तरुण बचावल्याने त्याचा जीव वाचला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील सतीश थेऊरकर (वय २३, रा. करडे, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य लंघे (रा. करडे), बबलू सोनलकर (रा. सिंहगड रोड, हवेली), टिन्या शेळके (रा. रांजणगाव गणपती), दाद्या उर्फ रोहन पंचमुख (रा. करडे) तसेच अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, १८ जुलै रोजी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास करडे येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळ व स्मशानभूमीशेजारील तळ्याजवळ आरोपींनी जुन्या वादातून फिर्यादीला शिवीगाळ व धमकावून त्याच्या दिशेने पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार केला. मात्र फिर्यादीने प्रसंगावधान राखून बचाव केल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमे तसेच शस्त्र अधिनियम, १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Karade Firing ? : या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत. Advertisement ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Inamgaon Accident : इनामगाव येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा