Contents1 Ambedkar Jayanti Article Series अखेर पुर्ण : भरभरून प्रतिसाद!🙏🌹2 Ambedkar Jayanti Article Series 2026 चे सर्व लेख क्रमाने….3 1.डॉ. बाबासाहेब आम्बेडकर बायोग्राफी- लेख -14 2.डॉ. बाबासाहेब आम्बेडकर Thoughts:समता, शिक्षण, जमीन मालकी, गरीबी इ.-लेख-25 3.Why Babasaheb matters today?:लेख-3 (English)6 5.आपली सन्विधानीक जबाबदारी काय असते? लेख_4 (मराठी)7 5.शिक्षा से क्रांती तक – लेख- 5 ( हिंदी)8 6.Education is Tool of Social Change: लेख – 6 (English)9 7.Castes in India Today : लेख -710 8. जातीवादी समाज कब बदलेगा? : लेख : 811 9. Indian Constitution and Modern Democracy : लेख – 9 (English)12 10. आदर्श आम्बेडकर जयंती कशी साजरी करावी? : लेख – 10 (मराठी)13 11. कान्शीराम सच्चे आम्बेडकरवादी क्यूँ माने जाते हैं? : लेख : 1114 12. Reservation Within Reservation महाराष्ट्र सरकार व अनु. जाती आरक्षण विभाजन : लेख : 1215 13. SC Reservation in Maharashtra : लेख : 13 ( English)16 14. 59 अनुसुचीत जातीयो के लिस्ट न्याय या विभाजन? : लेख – 1416.1 About The Author16.1.1 Dr.Nitin Pawar16.2 ❤️ Support Satyashodhak Blog Ambedkar Jayanti Article Series अखेर पुर्ण : भरभरून प्रतिसाद!🙏🌹 दिनांक 18 एप्रिल 2026 : सत्यशोधक टिम Ambedkar Jayanti Article Series मी शब्द दिल्यानुसार पुर्ण करुन आपल्या पर्यंत पोचवली.आपण भरभरून वाचत आहात, मेसेज करत आहात, फोन करत आहात. हे मला बळ व प्रेरणा देते. आपले किती आणि कसे आभार मानावेत हे मला कळत नाही 🙏🙏🙏🙏 मी फारसा कधी आम्बेडकर जयंती मधे भाग घेत नसे. आजही नाही. पण बाबासाहेबांचे मुळ लेखन खन्ड 1,2,3 असे. इतरांची य. दी. फडके, रावसाहेब कसबे, काम्रेड शरद पाटील यांच्या पासून ते नरेंद्र जाधव यांचे,’ आम्ही आणि आमचा बाप’, इ. बाबासाहेब यांच्या वरील पुस्तके ही वाचत असे. एकदा पुण्यात एक आम्बेडकरवादी वक्ते बोलले. नंतर मी त्यांना डॉक्टरेट न मिळाल्याची खन्त व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले,’अरे बेटा, तसे काही नसते डिग्रीवर! तु इतके ज्ञान मिळव की जणू,‘एक चालते बोलते विद्यापीठ ‘ बन! तुला माहित नाही. या पदव्या कशा दिल्या जातात? पण त्यांना काही येत नाही!मी महाविद्यालयातील प्राध्यापक मन्डळीन्ची व्याख्याने पुष्कळ ऐकत असे. पदवी, पदवीत्तर ला असताना. त्यापेक्षा जास्त माहिती मला माझ्या वाचनातुन मिळालेली असे. किती तरी बाबी प्राध्यापकानी विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजेत. पण का सांगत नाहीत? की त्यांनाच माहित नाहीत? असा प्रश्न मला पडत असे. तरी मी Management मधे डॉक्टरेट मिळवली. प्रबंध लिहीला. इग्रजीत लिहिला. पण नोकरी साठी प्रयत्न करत नसे. कारण तोपर्यंत माझेच एक तत्वज्ञान तयार झाले होते. ‘चालतं बोलत विद्यापीठ’ हा शब्द मी कायम ध्यानात ठेवला होता. मग शेकडो ग्रन्थ, पुस्तके, आडीयो बुक, यु ट्यूब वरील व्हिडीओ, चर्चा, पोडकास्ट वाचले, ऐकले, पाहिले.आपल्या जीवनाचा अर्थ ब्रम्हान्डात,’मच्छर ‘की औकात का है. सर्व आजवर पृथ्वीवर झालेले लहान मोठे लोक, प्राणी केवळ,’मच्छर ‘!का? थोडा स्वतः बीग बेन्ग पासून बीग क्रन्च पर्यंत सन्क्षिप्त चक्कर मारा. म्हणजे समजेल. असो. जीवन्त आहे म्हणून जगणे आपल्या हातात आहे. विवेक सांगतो, तर मग किमान अर्थपूर्ण जीवन तरी जग ¡ पण हा,’अर्थ ‘तरी कोनता? मला वाट़ले ज्यात आनंद मिळतो तो अर्थ. आनंद कोनता उच्चतर मिळावा? तर ज्ञान मिळवल्याचा!ज्ञान काय – मला काहीच ज्ञान नाही. याचे ज्ञान. का? वर लिही़ले आहे.,’मच्छर ‘! जास्त खोलात पुढे लिहीनच. तर या वर्षी, वर्ष म्हणजे देखील भ्रमच. क्षण म्हणू. जगण्याला आकार आणि अर्थ देणारे दोन मुख्य महामानव माझ्यासाठी बाबासाहेब आणि ओशो. कार्ल मार्क्स पासून इव्हाल नोआह हरारी यांच्या पर्यंत किमान 25 तरी महान लोक मला वाटले. हे व्यक्तीसापेक्ष असेल हे मी जाणतो. तन्त्रज्ञान डिजिटल, ए आय सारखं आले. अगदी माझ्या हातात. या मोबाईल फोनवर देखील आले. लेखक बनण्याची एक आन्तरीक कामना माझी नेहमी राहिली. आधी बरच कागदावर लिहीलेले आहे. आता any time, any where थोडं फार उत्पन्नासह देखील. पैसा, सम्पत्ती, परिवार कुणी विचारलं तरच आठवते. आणि हे मुर्ख विचारतातच. तेव्हा आठवते. दिवस 50 तासांचा असता तर किती बरे झाले असते नाही? 24 तास अपुरे पडतात. कधी पन्नासी पर्यंत आलो ते परवा परवा समजलं ते डॉक्टरांनी सागितलं की या वयात आता असे त्रास सुरु होणारच. सर्वांनाच होतात. तेव्हा भानावर आलो. वाचनातुनच हे ही समजलं होते की असे काही,’वेडे पीर’ असतातच कायम समाजात. तर माझी खरं तर ही साईट जी आहे. ती मी ग्रन्थ समजतो. मुख्य भाग बातम्या, हे करिअर, व्हिडीओ बातम्या -यु ट्यूब चेनल,असं बरच. पण हा कचराच. मच्छर सारखाच प्रकार! आज कुणाचे मन्गळसुत्र हिसकावले, गुन्हेगार पोलिसांनी शिताफीने कसे पकडले, नवर्याकडुन मारहाण, पण यांना मुले होतात. म्हणजे हे शारीरिक, मानसिक पातळीवरचे प्रेम करतात तरी पोलीस स्टेशन, चोर्या, मारामारी, कोयता, गावठी बन्दुक, आता शिरुरपर्यन्त ड्रग्ज सुद्धा पोचले! पोरगी पळून गेल्यावर जर फोनवरून किंवा अन्य मार्गाने आई, वडील, भाऊ, नातलग कशाला उगाचच पोलीस स्टेशन ला येतात कळतं नाही. तिच्या इच्छेने तिने तिचा जीवन साथी निवङला तर यांचे काय दुखते.कळत नाही. तिला शोधून आणा म्हणतात पोलिसांना. तिच्या जीवाला धोका वगैरे खोटे सांगतात. नको तिथे पोलिसांची एनर्जी आणि सरकारचा पैसा कशाला घालवतात कोण जाणे हे लोक!इ. इ. सर्व ‘कचरा’ अर्थात ‘मच्छर’लेवलचे जगणे. यांना सांगा कुणीतरी अर्थपूर्ण जगण्याचे तन्त्र. तर मला वाटले बाबासाहेब यांची काय असेल तितकी वर्षांवी. मला लिहिता येते. मग जयंती तारीख 14 म्हणून 14 लेख 1 ते 14 एप्रिल लिहावेत. ते भरपूर शेअर करावेत.मराठी, हिंदी व इन्ग्लिश तीन भाषेत लिहावीत. तिन्ही भाषीक काही लोकांपर्यंत जातील. पुर्ण माझे युनिक लेखन असावे. म्हणून दररोज लिहीत गेलो. 1 ते 14 एप्रिल पर्यंत. आधी मी जे बोललो ना तो उच्चतर आनंद मिळाला. तो मिळतो. क्रिएटीव वर्क केल्यावर. पैसे काहीच मिळत नाहीत. मला मिळुही नयेत. फक्त आनंद मिळाला. म्हणून आणि ते काम केले. आता सर्व 14 लेख भाषेवाईज एकाच पोस्ट मधे देऊन माझ्या वाचकान्ची सोय करावी. म्हणून ही पोस्ट देखील लिहित आहे. आता पहाटेचे 5:17 झालेत. पण काळ सावकाश चालावा जेणेकरून ही पोस्ट पुर्ण होईल “ 🙏🌹Ambedkar Jayanti Article Series लिहिण्याचे असेच प्रसंगी येवोत. आपण त्यासाठी माझ्या पाठीशी राहिले. तसे पुढे ही राहाल, अशी अपेक्षा 🙏🌹 Ambedkar Jayanti Article Series 2026 चे सर्व लेख क्रमाने…. 1.डॉ. बाबासाहेब आम्बेडकर बायोग्राफी- लेख -1 https://www.satyashodhak.blog/dr-br-ambedkar-biography-2026/ 2.डॉ. बाबासाहेब आम्बेडकर Thoughts:समता, शिक्षण, जमीन मालकी, गरीबी इ.-लेख-2 https://www.satyashodhak.blog/ambedkar-thoughts-2026/ 3.Why Babasaheb matters today?:लेख-3 (English) https://www.satyashodhak.blog/babasaheb-vision…6-why-it-matters/ 5.आपली सन्विधानीक जबाबदारी काय असते? लेख_4 (मराठी) https://www.satyashodhak.blog/ambedkar-jayanti-2026-our-duties-4/ 5.शिक्षा से क्रांती तक – लेख- 5 ( हिंदी) https://www.satyashodhak.blog/ambedkar-jayanti…ation-revolution/ 6.Education is Tool of Social Change: लेख – 6 (English) https://www.satyashodhak.blog/ambedkar-jayanti-2026-education/ 7.Castes in India Today : लेख -7 https://www.satyashodhak.blog/ambedkar-jayanti-2026-castes-today/ 8. जातीवादी समाज कब बदलेगा? : लेख : 8 https://www.satyashodhak.blog/ambedkar-jayanti-2026-8/ 9. Indian Constitution and Modern Democracy : लेख – 9 (English) https://www.satyashodhak.blog/indian-constitut…modern-democracy/ 10. आदर्श आम्बेडकर जयंती कशी साजरी करावी? : लेख – 10 (मराठी) https://www.satyashodhak.blog/how-to-celebrate-ambedkar-jayanti/ 11. कान्शीराम सच्चे आम्बेडकरवादी क्यूँ माने जाते हैं? : लेख : 11 https://www.satyashodhak.blog/kanshiram/ 12. Reservation Within Reservation महाराष्ट्र सरकार व अनु. जाती आरक्षण विभाजन : लेख : 12 https://www.satyashodhak.blog/reservation-within-reservation-2/ 13. SC Reservation in Maharashtra : लेख : 13 ( English) https://www.satyashodhak.blog/sc-reservation-in-maharashtra/ 14. 59 अनुसुचीत जातीयो के लिस्ट न्याय या विभाजन? : लेख – 14 https://www.satyashodhak.blog/sc-reservation-policy/ 🙏🌹Ambedkar Jayanti Article Series लिहून अशी बाबासाहेब यांना मनापासून आदरांजली 🙏🌹 🙏“Educate, Agitate, Organize” 🙏” share / subscribe” केंद्र शासन चला अंधश्रद्धा गाडु या ! बातम्या मराठी साहित्य महाराष्ट्र महाराष्ट्र शासन योजना राजकारण विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण व नोकरी शिरुर पुणे क्राईम शिरूर पर्यटन शेअर मार्केट स्टडी संपादकीय समाज व विचार केंद्र शासन चला अंधश्रद्धा गाडु या ! बातम्या मराठी साहित्य महाराष्ट्र महाराष्ट्र शासन योजना राजकारण विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण व नोकरी शिरुर पुणे क्राईम शिरूर पर्यटन शेअर मार्केट स्टडी संपादकीय समाज व विचार About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Reservation Within Reservation in Maharashtra – 13% SC Sub-Reservation in Maharashtra : Justice or Division Before Ambedkar Jayanti ? – 12 Maharashtra Din : महाराष्ट्र दिनी “माझी मैना गावाकडे राहिली…” ते आजचा महाराष्ट्र – अस्मिता, संघर्ष आणि वास्तव