SAVE 20250114 162056

बहुजन समाजाचे झुंजार कार्यकर्ते श्री. दादासाहेब जगताप यांचे दुःखद निधन !

बहुजन वंचितांसाठी आयुष्यभर लढा : वयाच्या ९४ वर्षी सोडला अखेरचा श्वास !

शिरुर,दिनांक 14 जानेवारी : (सत्यशोधक न्यूज) 

बहुजन समाजाचे झुंजार कार्यकर्ते श्री. दादासाहेब जगताप यांचे दुःखद झाले आहे.बहुजन वंचितांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वयाच्या ९४ वर्षी अखेरचा श्वास त्यांनी सोडला आहे. कोल्हापुरसह महाराष्ट्रातील 'बहुजन चळवळी' ची मोठी हानी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापुर जिल्हयासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा !

 

बहुजन समाजाचे झुंजार कार्यकर्ते श्री. दादासाहेब जगताप यांचे दुःखद झाले आहे.बहुजन वंचितांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वयाच्या ९४ वर्षी अखेरचा श्वास त्यांनी सोडला आहे. कोल्हापुरसह महाराष्ट्रातील ‘बहुजन चळवळी’ ची मोठी हानी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापुर जिल्हयासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

Read more >>

बहुजन मुक्ती पार्टी चे नाथाभाऊ पाचर्णे ‘शिरुर हवेली’ विधानसभा निवडणूकीच्या मैदानात ! स्व. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे ते जवळचे नातलग !

धनगर समाजाला विविध मागण्यांसाठी एकत्र येण्याचे शिवाजीराव कुर्हाडे यांचे आवाहन !

कोल्हापुर आणि पुरोगामी चळवळ. .

कोल्हापूर शहर पुरोगामी चळवळीसाठी आणि परिवर्तनाच्या लढ्यातील एक ‘मानबिंदू’ ठरलेले शहर आहे. कोल्हापूर शहरांमध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता, निर्मूलन ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक चळवळीचा पुढे चालवलेला वारसा ; बाबरी मशीद पडल्यानंतर कोल्हापूर हे एकमेव अशी शहर होते की जेथे कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण झाला नाही. त्याचे कारण कोल्हापूर शहरांमध्ये वर्षानुवर्ष शतकापेक्षाही जास्त काळ पुरोगामी विचारांच्या प्रबोधनाची परंपरा असणे हे होते. या कोल्हापूरने अनेक पुरोगामी कार्यकर्ते, विचारवंत घडवले.कांब्रेड गोविंद पानसरे हे देखील कोल्हापूर येथीलच ! प्रतिगामी विचारांच्या लढाईत ते शहिदही झाले.अशा अनेक लोकांपैकी एक कार्यकर्ते श्री. दादासाहेब जगताप हे होते.

‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !

प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,

‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog 

——

 

श्री.दादासाहेब जगताप यांचे कार्य. ..

बहुजन समाजाचे झुंजार कार्यकर्ते श्री. दादासाहेब जगताप यांचे दुःखद झाले आहे.बहुजन वंचितांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वयाच्या ९४ वर्षी अखेरचा श्वास त्यांनी सोडला आहे. कोल्हापुरसह महाराष्ट्रातील 'बहुजन चळवळी' ची मोठी हानी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापुर जिल्हयासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
मराठा बोर्डिंग’च्या निर्मितीत योगदान !

 

श्री. दादासाहेब जगताप हे
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुजन, वंचित, दलित आणि कष्टकरी यांच्या चळवळीत सक्रिय असलेले
कॅाग्रेसचे जेष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते होते.आणि तशीच दादासाहेब जगताप यांची ओळख महाराष्ट्राला आहे. ‘बहुजन समाजाने जातीपातीच्या उतरंडीतून बाहेर पडून फुले-शाहू आंबेकरांची विचारधारा जोपासली पाहीजे’ यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयन्त करत केले .श्री. दादासाहेब जगताप हे संयुक्त महाराष्ट्राच्याआंदोलनातही चळवळीत सक्रिय राहिले होते. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरात व्हावे यासाठी त्यांनी भरपुर प्रयत्न केले. १९६९ साली श्री. दादासाहेब जगताप यांनी ‘बहुजन समाज’नावाचे साप्ताहिक सुरु केले.
बहुजन समाजाचे प्रबोधन करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांच्या (२७ नोव्हेंबर १९७०) पुण्यतिथीला ‘फुले शाहू आंबेडकर विचार मंचा’ची स्थापना श्री. दादासाहेब जगताप केली. संयुक्त महाराष्ट् आंदोलनात श्री. दादासाहेब जगताप यांना दोन महीने शिक्षा झाली होती. श्री.दादासाहेब जगताप यांनी ‘सेंट्रल बॅंके’चे ‘डायरेक्ट’ म्हणुन सुद्धा जबाबदारी पार पाडली होती .श्री. दादासाहेब जगताप हे ‘प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग’च्या गव्हर्निग कौन्सिल कार्यकारिणीवर संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी प्रिन्स शिवाजी बोर्डिंग संस्थेत न्यू कॅालेजची स्थापना करावी म्हणून जगताप यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यासैनिक शंकरराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते.

Ready more >>

शिरूर येथे सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम संपन्न !

नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांच्या हस्ते ‘द बेस्ट’सलोन चे उद्धाटन !

काळम्मावाडी धरणाच्या निर्मितीत योगदान…

श्री. दादासाहेब जगताप यांनी
मुबंई शहरातील ‘क्रॅाफर्ड मार्केट’ला ‘महात्मा जोतीराव फूले’ यांचे नाव देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच ‘काळम्मावाडी धरण’च्या मंजूरसाठी त्यांनी बहुमोल असा पाठपुरावा केला होता.

श्री.शंकररावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केले काम…

कोल्हापूर नगरपालिकेची महानगरपालिका व्हावी म्हणून त्यावेळचे नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांच्यामार्फत प्रयत्न केले होते . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.शंकररावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कॅाग्रेसचे काम निष्ठेने केले. तसेच पक्षाची बांधिलकी आणि धोरणांशी सुसंगत व्यवहार अखेरपर्यंत केला.पक्षाची परंपरा त्यांनी शेवटपर्यंत जपली होती.

“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”

श्री. दादासाहेब जगताप त्यांच्या मागे दोन मुले , सुना आणि चार नातवंडे असा परिवार आज आहे.
श्री. दादासाहेब जगताप यांचे
रक्षा विसर्जन बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पंचगंगा घाट कोल्हापूर येथे होणार आहे.

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support