Domestic Violence Shirur News : शिरूरमध्ये पतीकडून पत्नी व सासूला मारहाण आणि धमकी प्रकरण दर्शवणारे प्रतीकात्मक चित्रशिरूरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नी व सासूला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण; सोन्याची चैन तोडल्याचा आरोप

शिरुर, दिनांक 27 मे 2026

Domestic Violence Shirur News  कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी व सासूला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

Domestic Violence Shirur News : सोन्याची चैन तोडून पसार!

Domestic Violence Shirur News नुसार शिरूर शहरामधील बाबुराव नगर परिसरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी व सासूला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

त्याचबरोबर भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्याच्या मेव्हण्याच्या गळ्यातील अर्धा तोळे वजनाची सोन्याची चैनही आरोपीने तोडण्याचा प्रयत्न आरोपीने नेली.त्यातील अर्धी चैन घेऊन आरोपी पसार झाल्याची माहिती पोलिसांनी फिर्यादीने दिली.

फिर्यादी सुनील घावटे- बाबुराव नगर शिरुर

याप्रकरणी प्रणाली सुनील घावटे,वय -26 वर्ष, राहणार- सध्या बाबुराव नगर, शिरूर, तालुका_-.शिरूर, जिल्हा. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दिनांक 25 मे 2026 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. शिरुर मधील बाबुराव नगर, शिरूर येथे घडली. फिर्यादी त्यांच्या आईच्या घरी असताना त्यांचे पती सुनील सुरेश घावटे हे राहणार-बोराडे मळा, शिरूर,यांनी “तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत आपल्या घरी चल” असे म्हणाले.

त्यांच्या हातातील लोखंडी कोयता दाखवला. पत्नी व सासूला मारहाण केली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सोन्याची चैन तोडली अर्धी चैन घेऊन आरोपी  पसार!

दरम्यान फिर्यादीचा भाऊ प्रतिक हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये आला होता. तेव्हा आरोपीने त्याला धक्काबुक्की केली. यावेळी त्याच्या गळ्यातील अर्धा तोळे वजनाची सोन्याची चैन तोडली. त्यातील अर्धी चैन घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असल्याचे सांगण्यात आले.

शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 479/26 असा तर अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 119(1), 115(2), 352, 351(2), 351(3) तसेच आर्म अॅक्ट कलम 4 व 25 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कोथळकर करत असून प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.

आणखीन बातम्या वाचा-

Breaking Shirur Crime : शिरूरमध्ये 24.38 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Shirur Crime Drugs News : मोठी बातमी? शिरूरमध्ये अमली पदार्थ प्रकरण उघड; तिघांना अटक, 21.52 लाखांचा मुद्देमाल जप्त!

MD Drug Seizure Shirur : शिरुर मेफेड्रोन बालक ताब्यात , ₹1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त

अधिक माहिती साठी भेट द्या खालील लिंक्सना–

Maharashtra Police Official Website-

https://mahapolice.gov.

Pune Rural Police–

https://puneruralpolice.org

Indian Kanoon – Arms Act 1959

https://indiankanoon.org

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support