Buddha Compassion म्हणजे ‘करुणा’! एक हळहळणारा भाव! आपण मानवाचा इतिहास वाचला तर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते—माणुस प्राणी होता. आजही आहे. तो माणूस बदललाही आहे.वाचा या बातमीत – एक सत्य – करुणा! 6 जुन 2026, शिरुर https://www.satyashodhak.blog/wp-content/uploads/2026/06/VID-20260606-WA0008.mp4 Contents1 Buddha Compassion अर्थात बुद्धाची मानवतेला दिलेली भेट,’करुणा’—1.1 माणूस खरोखरच प्रगत झाला आहे का?1.2 ‘करुणे’चा खरा अर्थ काय?1.3 विज्ञान, आपण, आपली संवेदनशीलता–1.4 अशा काळात ‘करुणे’ची गरज अधिक वाढते—1.5 बुद्ध- महावीर : आधुनिक जग—1.6 अजूनही आशा जिवंत आहे—1.7 सारांश —1.7.1 आणखीन ‘सत्यशोधक’ अर्थपुर्ण लेखन—1.7.2 About The Author1.7.2.1 Dr.Nitin Pawar1.7.3 ❤️ Support Satyashodhak Blog Buddha Compassion अर्थात बुद्धाची मानवतेला दिलेली भेट,’करुणा’— Buddha Compassion म्हणजे ‘करुणा’! एक हळहळणारा भाव! आपण मानवाचा इतिहास वाचला तर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते—माणुस प्राणी होता. आजही आहे. तो माणूस बदललाही आहे. पण पूर्णपणे बदललेलाही नाही. हजारो वर्षांपूर्वी जो माणूस होता, तोच माणूस आजही आहे.त्याचे जैवरसायन तेच आहे. त्याच्या हातातील साधने बदलली, त्याच्या भौतिक राहणीमानात क्रांतिकारक बदल झाले. विज्ञानाने अभूतपूर्व उन्ची गाठली. पण मानवी मनातील प्रेम, द्वेष, लोभ, करुणा, हिंसा, सहानुभूती आणि स्वार्थ या भावना आजही त्याच आहेत. इतिहासाची पाने उलगडली तर आपल्याला युद्धे, संघर्ष, रक्तपात, साम्राज्यांची उभारणी, त्यांचा विनाश यांचीच अधिक नोंद दिसते. रक्तपातच अधिक दिसतो. तसाच आजही चालला आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसावर सत्ता गाजवण्यासाठी कधी धर्माच्या नावाखाली, कधी जातीच्या नावाखाली, राष्ट्राच्या नावाखाली, कधी संपत्तीच्या हव्यासापोटी असंख्य युद्धे केली. तलवारी, भाले, तोफा, बॉम्ब, क्षेपणास्त्रे, रासायनिक, जैवीक, अण्वीक अस्रे या सगळ्यांना जन्माला घातले.त्यांचा वापरही केला. परंतु त्यांचा उपयोग बहुतेक वेळा विनाशासाठीच केला. आजही आपण गाझा पट्टी , इराण, इस्रायल, युक्रेन किंवा जगातील इतर संघर्षग्रस्त प्रदेशांकडे पाहतो. तेव्हा तिथे आधुनिक विज्ञानाची प्रगती आणि मानवी क्रौर्य यांचा विचित्र भयावह संगम दिसतो. काही सेकंदांत शेकडो जीव घेऊ शकणारी शस्त्रे मानवाने निर्माण केली आहेत. पूर्वी एका व्यक्तीला मारण्यासाठी तलवार उचलावी लागत होती. आज एका बटणाला दाबले तर हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. माणूस खरोखरच प्रगत झाला आहे का? याचे उत्तर पूर्णपणे होकारार्थीही नाही आणि नकारार्थीही नाही. कारण याच मानवजातीने करुणेची, सहवेदनेची व माणुसकीची महान परंपराही जपली आहे. आणि त्या परंपरेचे सर्वात प्रभावी प्रतीक म्हणजे Buddha Compassion.अर्थात बुद्धाची,’करुणा’! ‘करुणे’चा खरा अर्थ काय? करुणा म्हणजे केवळ दया नव्हे. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याची, त्या कमी करण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याची क्षमता. बुद्धांनी करुणेला धर्माचा, तत्त्वज्ञानाचा आणि मानवी जीवनाचा केंद्रबिंदू मानले. भगवान महावीर दुरच्या माणसाची वेदना स्वतः अनुभवत. गुलामाला मालकाने चाबकाचे फटके महावीराच्याही शरीरावर उमटत, वेदनाही ते अनुभवत! आज आपण “मानवता” हा शब्द सहज वापरतो. परंतु मानवतेचा अर्थ प्रत्यक्ष कृतीतून दिसतो.करुणेतुन दिसला पाहिजे. एखाद्या संकटग्रस्त व्यक्तीला मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे, जखमी प्राण्याची काळजी घेणे किंवा एखाद्याच्या दुःखात सहभागी होणे—यातूनच करुणा प्रकट होत असते. अलीकडे एक छोटासा प्रसंग पाहायला मिळाला. रामलिंग रोडवर भिमराव तराळ यांना एक घायाळ पक्षी जमिनीवर पडलेला दिसला. अनेक लोकांनी तो पाहिला. काही जण उत्सुकतेने बघत होते.आज समाज बघ्यान्चा समाज बनला आहे! काहींनी त्याचा व्हिडिओ काढला. पण एका भिमराव, त्यांचा मुलगा अमित यांनी मात्र त्या पक्ष्याला उचलले, त्याला पाणी पाजले. त्याच्या जखमेची काळजी घेतली आणि त्याला पुन्हा जगण्याची संधी दिली.(व्हिडीओत पहा पक्षी सुखावलेला दिसतो.) वरकरणी हा साधा प्रसंग वाटू शकतो. पण प्रत्यक्षात तो आपल्या समाजाचा आजचा आरसा आहे. पाहणारे जास्त, मदत करणारे कमी, असे चित्र! आजच्या काळात एखादा अपघात झाला तर काही मिनिटांत मोठी गर्दी जमते. लोक मोबाईलवर व्हिडिओ, फोटो काढतात. सोशल मीडियावर पोस्ट करतात.जास्त views मिळावेत म्हणून,व्हायरल व्हावे म्हणून.पण प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणारे हात फार कमी असतात. ही केवळ भारताची समस्या नाही. संपूर्ण जगात ही प्रवृत्ती वाढताना दिसते. आपण इतरांच्या दुःखाकडे प्रेक्षक म्हणून पाहतो. त्यात सहभागी होण्याचे टाळतो. पण याच गर्दीत एखादा माणूस पुढे येतो. तो जखमी व्यक्तीला उचलतो. रुग्णवाहिका बोलावतो. पोलिसांना माहिती देतो. एखाद्या प्राण्याला वाचवतो.माणसाला वाचवतो.आणि त्या क्षणी तो माणूस फक्त एक व्यक्ती राहत नाही; तो Buddha Compassion चा जिवंत प्रतिनिधी बनतो.बुद्धाची करुणा तिथे प्रगट होते. विज्ञान, आपण, आपली संवेदनशीलता– आजचा समाज इतिहासातील सर्वात वैज्ञानिक समाज आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय संशोधन, अवकाश विज्ञान, जैवतंत्रज्ञान—मानवाने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. परंतु या प्रगतीबरोबरच एक मोठे संकटही निर्माण झाले आहे. ते म्हणजे संवेदनशून्यता.माणसाचे एलियनेड होणे. मनुष्यत्वाला पारखे होणे. भौतिक सुखांच्या स्पर्धेत माणूस इतका गुंतला आहे की त्याला दुसऱ्याच्या वेदना जाणवेनाशा झाल्या. पैसा, प्रतिष्ठा, पद, प्रसिद्धी आणि उपभोग यांच्याभोवतीच फिरणारे जीवन अधिकाधिक केंद्रस्थानी आले. अशा काळात ‘करुणे’ची गरज अधिक वाढते— करुणा ही विज्ञानाच्या विरोधात नाही. उलट विज्ञानाला मानवी दिशा देणारी शक्ती असते. विज्ञान आपल्याला क्षमता देते.शक्ती देते.करुणा त्या क्षमतेचा उपयोग कशासाठी करायचा हेही शिकवते. बुद्ध- महावीर : आधुनिक जग— गौतम बुद्ध आणि महावीर यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी अहिंसा, करुणा आणि सर्व सजीवांविषयी सहवेदना,आदर यांचे तत्त्व मांडले. आज पर्यावरण संकट, युद्धे आणि सामाजिक तणावाच्या काळात ही तत्त्वे अधिकच महत्त्वाची ठरतात. एखाद्या पक्ष्याचा जीव वाचवणे ही केवळ भावनिक कृती नाही. ती एका व्यापक विचारसरणीची अभिव्यक्ती आहे. ती सांगते की पृथ्वी फक्त मानवाची नाही. ती सर्व जीवांची आहे. जेव्हा एखादा माणूस घायाळ पक्ष्याला पाणी पाजतो, तेव्हा तो नकळतपणे संपूर्ण जीवनव्यवस्थेचा सन्मान करत असतो.जगाकडे करुणेने पाहतो. अजूनही आशा जिवंत आहे— आज जगात युद्धे आहेत. द्वेष आहे. हिंसा आहे. सामाजिक माध्यमांवर विषारी भाषा आहे. राजकीय ध्रुवीकरण आहे. पण त्याच वेळी कुठेतरी एखादा डॉक्टर गरीब रुग्णावर मोफत उपचारही करतो. कुठेतरी एखादा शिक्षक विनामूल्य शिक्षण देतोही. कुठेतरी एखादा युवक जखमी प्राण्याला वाचवतोही .कोणी पत्रकार,’पितपत्रकारीता’ नाकारतोही! याच कृती मानवतेला जिवंत ठेवतात. माणसाच्या इतिहासात हिंसा नेहमीच मोठ्या अक्षरांनी लिहिली गेली आहे. पण मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवणारी शक्ती हिंसा नसते,ती करुणा असते . सारांश — आजच्या काळात Buddha Compassion ही केवळ धार्मिक/धम्म संकल्पना नाही. ती मानवाच्या अस्तित्वासाठी ‘अत्यंत’ मी या शब्दावर जोर देऊ इच्छितो.कारण तिसरे महायुद्ध केवळ करुणाच टाळू शकचे. तेच आवश्यक जीवनमूल्य आहे.पैसा, सत्ता, नाही.विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक प्रगती आर्थिक विकेन्द्रीकरणासह, करुणा, सहवेदना आणि माणुसकीची जोड नसेल तर तो ‘विकास’ नसेल ‘भकास’ असेल वाळवंटातील! घायाळ पक्ष्याला मदत करणाऱ्या त्या कुटुंबाचा प्रसंग आपल्याला एक धडा देतो. जग बदलण्याची सुरुवात मोठ्या घोषणांनी होत नाही. ती अशा छोट्या कृतींनी होते.पटते का हे आपल्याला. पटले तर तुम्हीही अशा अनेक गोष्टी करु शकता. अगदी छोट्या छोट्या. मग आनंद कोनत्या स्रेणीतला मिळतो पहा! माणसाने पुन्हा माणसाकडे जावे. निसर्गाकडे जावे. प्राणी-पक्ष्यांकडे जावे. आधुनिक विज्ञानाला स्वीकारावे, पण करुणेला विसरू नये. कारण शेवटी एखादा ‘सभ्यते’ चे मोजमाप तिच्या इमारतींनी, शस्त्रांनी किंवा संपत्तीने होत नाही. ते होते ती दुर्बल, जखमी आणि असहाय्य जीवांशी ती कशी वागते यावर. आणि म्हणूनच, आजही Buddha Compassion ही मानवतेच्या भविष्याची सर्वात मोठी आशा आहे.बुद्धाची करुणाच जगाला वाचवू शकते! आणखीन ‘सत्यशोधक’ अर्थपुर्ण लेखन— Vidyadham Prashala Shirur SSC Result 2026:निकालाचा दिवस ; विद्याधाम प्रशालेत आनंदाचा उत्सव बालवधू वेश्या बनल्याची कथा Shirur Education News: सरकारी शाळा वाचवा अभियानांतर्गत पद नियुक्ती कार्यक्रम उत्साहात About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Bakri Eid Meeting 2026 : शिरूर पोलिसांची बकरी ईदपूर्व बैठक; शांततापूर्ण सण साजरा करण्याचे आवाहन