Ambedkar Castes in India Thesis:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'Castes in India: Their Mechanism, Genesis and Development' (1916) या संशोधन प्रबंधात जातीव्यवस्थेची उत्पत्ती, सजातीय विवाह आणि तिच्या प्रसाराचे शास्त्रीय विश्लेषण मांडले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'Castes in India: Their Mechanism, Genesis and Development' (1916) या संशोधन प्रबंधात जातीव्यवस्थेची उत्पत्ती, सजातीय विवाह आणि तिच्या प्रसाराचे शास्त्रीय विश्लेषण मांडले आहे.

24 July 2026

Ambedkar Castes in India Thesis नुसार भारतातील जातिव्यवस्थेची उत्पत्ती कशी झाली? जात हा जन्मावर आधारित सामाजिक गट कसा बनला? अशा प्रश्नांची सोडवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कशी केली,हे आपण समजून घेऊ…

प्रस्थावना—

या प्रश्नांची शास्त्रीय आणि ऐतिहासिक उत्तरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 मध्ये सादर केलेल्या “Castes in India: Their Mechanism, Genesis and Development” या संशोधन प्रबंधात दिली आहेत. या लेखात त्यांच्या विश्लेषणाचा सोप्या भाषेत आढावा घेऊ.

Ambedkar Castes in India Thesis : डॉ. आंबेडकरांच्या मते जात म्हणजे काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या मते, “जात म्हणजे एक बंदिस्त वर्ग’ (A Caste is an Enclosed Class) .

जातिप्रथेची उत्पत्ती कशी झाली, याची प्रमुख कारणे आणि प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत:

वर्गाचे जातीत रूपांतर (Class to Caste)

इतर समाजांप्रमाणेच प्राचीन हिंदू समाज हा देखील वर्गांमध्ये (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) विभागलेला होता . सुरुवातीला हे वर्ग खुले होते आणि पात्रतेनुसार व्यक्ती आपला वर्ग बदलू शकत होती .

मात्र, एका विशिष्ट वेळी ब्राह्मण (पुरोहित) वर्गाने स्वतःला इतर समाजापासून सामाजिकदृष्ट्या वेगळे केले आणि ‘बंदिस्त दरवाजाचे’ धोरण स्वीकारून स्वतःची एक वेगळी ‘जात’ निर्माण केली.

सजातीय विवाहाची सक्ती ( Endogamy)

भारतातील लोक मूळतः विजातीय विवाह (Exogamy) करणारे होते. डॉ. आंबेडकरांच्या मते,जातीची निर्मिती म्हणजे या विजातीय विवाहावर सजातीय विवाहाची (Endogamy) सक्ती लादणे होते.

स्वतःला एका जातीत मर्यादित ठेवण्यासाठी ब्राह्मण वर्गाने आंतरजातीय विवाहांवर बंदी घातली आणि केवळ स्वतःच्याच गटात विवाह करण्यास सुरुवात केली.

Ambedkar Castes in India Thesis : सजातीय विवाहसती, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाहाचा संबंध

सजातीय विवाह टिकवून ठेवण्यासाठी गटातील विवाहयोग्य स्त्री-पुरुषांचे संख्याबळ समान राखणे अत्यंत आवश्यक होते . नवरा किंवा पत्नी मृत झाल्यानंतर जो ‘अतिरिक्त पुरुष’ (Surplus man) किंवा ‘अतिरिक्त स्त्री’ (Surplus woman) उरत असे.

त्यांच्यामुळे जातीच्या बंदिस्तपणाला मोठा धोका निर्माण होत असे. या समस्येवर उपाय म्हणून खालील अमानुष प्रथा निर्माण झाल्या :

सती प्रथा:

मृत पतीच्या चितेवर विधवेला जाळून मारणे जेणेकरून अतिरिक्त स्त्रीचा प्रश्नच उरणार नाही

सक्तीचे वैधव्य:

सती न गेलेल्या विधवेला आयुष्यभर सक्तीने वैधव्य पाळायला लावणे आणि तिला अनाकर्षक बनवणे.

बालविवाह (बाल-जरठ)

विधुर पुरुषाचे लग्न जातीबाहेर होऊ नये म्हणून त्याचे लग्न वयात न आलेल्या लहान मुलीशी लावून देणे.

डॉ. आंबेडकरांच्या मते सती, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या प्रथा म्हणजे केवळ जातीव्यवस्था आणि सजातीय विवाह टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केलेली साधने (means) होती.

जातिव्यवस्था संपूर्ण समाजात कशी पसरली? (Spread of the Caste System):

ब्राह्मणांनी निर्माण केलेली ही व्यवस्था संपूर्ण समाजात कशी पसरली, यावर डॉ. आंबेडकरांनी दोन प्रक्रिया स्पष्ट केल्या आहेत:

अनुकरणाची प्रक्रिया (Psychological Process of Imitation)

ब्राह्मण वर्गाला समाजात सर्वोच्च प्रतिष्ठा आणि देवासारखे स्थान होते . त्यामुळे ‘अनुकरणाच्या नियमानुसार’ (Infection of imitation) इतर अ-ब्राह्मण वर्गांनीही ब्राह्मणांच्या सजातीय विवाहाच्या धोरणाचे आणि सती, बालविवाह यांसारख्या प्रथांचे अंधानुकरण केले आणि स्वतःलाही बंदिस्त जातींमध्ये रूपांतरित केले.

यांत्रिक प्रक्रिया (Mechanistic Process):

डॉ. आंबेडकर म्हणतात की, एकटी जात अस्तित्वात असू शकत नाही. जाती नेहमी बहुवचनातच असतात” (Castes exist only in the plural number) . जेव्हा ब्राह्मण आणि त्यांच्या पाठोपाठ इतर उच्च वर्गांनी स्वतःचे दरवाजे बंद करून घेतले, तेव्हा जे लोक या वर्गांच्या बाहेर राहिले, त्यांनाही नाईलाजाने स्वतःच्या स्वतंत्र जाती निर्माण कराव्या लागल्या.

तसेच ज्यांनी जुन्या नियमांचे उल्लंघन केले, त्यांना जातीबाहेर बहिष्कृत करण्यात आले आणि अशा बहिष्कृत गटांनाही नव्या जातींची स्थापना करावी लागली . याला ते “काहींनी स्वतःचे दरवाजे बंद केले, तर काहींना ते त्यांच्यासाठी बंद झालेले आढळले” (Some closed the door : Others found it closed against them) असे म्हणतात.

डॉ. आंबेडकरांच्या सिद्धांताचे महत्त्व

थोडक्यात सांगायचे तर, हिंदू समाजात मूळचे जे खुले वर्ग होते. त्यातील पुरोहित (ब्राह्मण) वर्गाने स्वतःभोवती कुंपण घालून ‘सजातीय विवाहाची’ सक्ती केली. पहिली जात निर्माण केली.

नंतर इतर वर्गांनी अनुकरणातून आणि बहिष्कृत होण्याच्या प्रक्रियेतून आपापल्या गटांचे जातीत रूपांतर केले.

निष्कर्ष—

Ambedkar Castes in India Thesis नुसार  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्थेची उत्पत्ती धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि ऐतिहासिक प्रक्रियेतून झाली असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या मते ‘सजातीय विवाह’ हीच जातिव्यवस्थेची किल्ली आहे.

म्हणूनच हा प्रबंध आजही समाजशास्त्र, इतिहास आणि भारतीय समाज समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

FAQs

Q1. डॉ. आंबेडकरांनी जात म्हणजे काय म्हटले आहे?

● उत्तर:”जात म्हणजे एक बंदिस्त वर्ग’ (A Caste is an Enclosed Class) .

Q2. Castes in India हा प्रबंध कधी सादर झाला?

● 1916

Q3. सजातीय विवाह म्हणजे काय?

● विवाह फक्त आपल्यालाच जातीत करणे.

Q4. सती प्रथा आणि जातिव्यवस्थेचा काय संबंध आहे?

● सजातीय विवाह टिकवून ठेवण्यासाठी गटातील विवाहयोग्य स्त्री-पुरुषांचे संख्याबळ समान राखणे

Q5. डॉ. आंबेडकरांच्या मते जातिव्यवस्था का टिकून राहिली?

● सजातीय विवाह’

Read more》》》》》》

Dr. B. R. Ambedkar : आजच्या प्रगत युगातही जात का टिकून आहे? बाबासाहेबांचे विस्मयकारक विश्लेषण

Ambedkar Jayanti Article Series: 14 Revolutionary Articles by Satyashodhak News

Satyashodhak Samaj Establishment : सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? स्थापना कधी, का आणि उद्दिष्टे काय होती?

SC Sub Categorization Maharashtra : उपवर्गीकरण, सामाजिक न्याय आणि पुढील दिशा (भाग 3–निष्कर्षात्मक विश्लेषण)

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.